तृतीय वर्ष बीबीएच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जून २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम दहा क्रमांकात येण्याचा बहुमान प्राप्त केला. कोमल महेश राजानी हिने ९४़ ६४ टक्के मिळवत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. अलफिया हुसतेअल्ली बोहरी ९४़ २१ टक्के विद्यापीठात द्वितीय क्रमांक, विशाल रवींद्र सुतार ९३़ ४१ टक्के विद्यापीठात तृतीय, मुस्कान जयप्रकाश मनसुखानी ९३़ ३६ विद्यापीठात पाचवे, साक्षी महेश केसवानी ९२़ २५ विद्यापीठात सहावे, तहा अल्ताफ बोहरी ९०़९३, तुषार संतोष देवरे ८६़४६, शिवानी चंद्रशेखर वानखेडे ९०़ ११, सोनल मनोज पटेल ८८़ ८२, कल्याणी राजेंद्र पाटील ८८़ ६८ टक्के मिळवीत परिसंस्थेत दहावे स्थान मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल यांनी केले.