लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील जमनालाल बजाज रोडवरील सुभाष टी हाऊससह तीन दुकानांना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली़ या आगीत वस्तु जळून खाक झाल्याने नुकसान झाले़ दरम्यान, आगीत जीवितहानी झालेली नाही़ शहरातील जमनालाल बजाज रोडवर गौड बंधुची सुभाष टी हाऊससह तीन दुकाने आहे. त्यात एक चहा पोहे, दुसरे मोटर वाईडिंग पाईप आणि तिसरे इलेक्ट्रीक दुकानाचा समावेश आहे़ ही तीनही दुकाने जवळ जवळ शंभर वर्ष जुनी आहेत़ मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागली. दुकान जुने व लाकडी असल्याने आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले होते़ यावेळी दुकानात ठेवलेले दहा गॅस सिंलेडर तातडीने बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळली़ तीन तासानंतर महापालिकेच्या अग्नीशमनबंबानी आगीवर नियंत्रण मिळविले़ आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धुळ्यात दुकानांना आग, नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 11:57 IST