शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

अग्नितांडवामुळे नुकसान!

By admin | Updated: February 2, 2017 00:50 IST

रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण अग्नितांडवाची घटना घडली़ या घटनेत सहा ते सात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े

धुळे : शहरातील 80 फुटी रोडवर असलेल्या रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण अग्नितांडवाची घटना घडली़ या घटनेत सहा ते सात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े मात्र घरे आगीच्या भक्षस्थानी पडत असताना मनपा अग्निशमन विभागाची ‘साखरझोप’ न उघडल्याने नागरिकांना अग्निशमन बंब स्वत: चालवून घटनास्थळी न्यावा लागला़ या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ घटनेची पोलिसात नोंद झाली आह़ेपहाटे 3 वाजता आगशहरातील 80 फुटी रस्त्यावरील नटराज चित्र मंदिरासमोर रमजानबाबानगर आह़े बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सर्व गाढ झोपेत असताना शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागली़ मुस्लीमबहुल वस्तीतील सदरचा परिसर दाट वस्तीचा असून सर्वाधिक घरे ही कच्चे बांधकाम, लाकडी व पत्र्याची आहेत़ त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल़े आजूबाजूला राहणा:या काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून तसेच आग लागलेल्या घरांचे दरवाजा ठोकून संबंधित नागरिकांना जागे केले  काही नागरिकांनी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरांमधील सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले, तसेच मिळेल त्या वस्तूने पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र आग आटोक्यात न येता वाढतच होती़ बघता बघता सहा ते सात घरांना आगीने वेढल़े अग्निशमन दल ‘साखरझोपेत’अनेकदा अग्निशमन विभागाशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितल़े त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरळ पांझरा जलकेंद्राच्या मागे असलेल्या अग्निशमन विभागाकडे धाव घेतली़ या ठिकाणी केवळ एक कर्मचारी झोपला होता़ याठिकाणी चालक नसल्याचे त्याने सांगितल़े  त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या बंबांमध्ये पाणीदेखील नव्हत़े बंब गळत असल्याने पाणी भरून ठेवता येत नसल्याचे कर्मचा:याने सांगितल़े त्यामुळे या ठिकाणी उभ्या असलेल्या एका बंबाला चावी असल्याच पाहून तेथे आलेल्या नागरिकांपैकी फिरोज आसिफ शहा या नागरिकाने अखेर ‘ड्रायव्हर’ची भूमिका बजावत बंब काढून तो सरळ घटनास्थळी नेला़ अखेर आगीवर नियंत्रणसदरचा बंब नागरिकांनी नेल्यानंतर अग्निशमन विभागाचे अन्य बंबदेखील घटनास्थळी दाखल झाल़े सुमारे दीड ते दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल़े माजी उपमहापौर फारूख शाह, काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केल़े घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी दाखल झाले होत़े या घटनेत फिरोजाबी बिस्मिल्ला शहा, गनीशहा बिस्मिल्ला शहा, मुनाफ लतीफ शेख, भिकारी शहा बिस्मिल्ला शहा, साबीर शेख रमजान शेख यांच्या घराला आग लागल्याने दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल़े सदर कुटुंबांपैकी भिकारी शहा यांच्या मुलाचे लग्न 20 ते 25 दिवसांवर आल्याने धान्य, कपडे, रोख रक्कम जळून खाक झाल़े या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक विभागाचे महानगराध्यक्ष युसूब पिंजारी यांनी नुकसान भरपाईसह अगिAशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांवर कारवाईची मागणी केली़आग लागल्याची माहिती मिळताच तीन बंब पाठविले होते. कर्मचारी या बंबांसोबत गेल्यामुळे कार्यालयात कर्मचारी नव्हत़े शिवाय आपण स्वत: सुटीवर असलेल्या दोन कर्मचा:यांना बोलावून घेत कार्यालयात पोहचत होतो. तसे संबंधित नागरिकांना फोनवर सांगितल़े मात्र विभागात असलेला एक बंब नागरिक घेऊन गेल़े  -तुषार ढाके, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा, धुळे