शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

अखेर अँटिजेन टेस्टला सुरुवात, ४ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:37 IST

१५ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तात्काळ कोरोनाचा अहवाल देणारी अँटिजन टेस्ट ची येथील जिल्हा रूग्णालयात सुरूवात करण्यात आली. अँटिजेन टेस्टमुळे १५ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे.अँटिजेन टेस्टचे किट प्राप्त होऊनही चाचण्यांना प्रारंभ झाला नव्हता. याबाबत लोकमतने, तात्काळ अहवाल देणारी अँटिजेन टेस्टची प्रतीक्षा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात अँटिजेन टेस्टला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी ५० रूग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी चार रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना या विषाणूजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे़ अनलॉकच्या टप्प्यात तर या महामारीने कहर माजविला आहे़ दररोज शंभराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत़ मृतांच्या आकडेवारीने देखील शंभरी गाठली आहे़ कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारावर कधीच गेलेला आहे़ हिरे वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी फुल्ल झाले आहे़ स्वॅब घेतल्यानंतर संबंधितांना दोन ते तीन दिवस अहवालाची वाट पहावी लागत होती़ त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचा जीव देखील टांगणीला लागायचा़ आता मात्र तसे होणार नाही, असे चित्र सद्या दिसून येत आहे़७ जुलै पासून १००० ‘अँटीजेन टेस्ट’किट उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालय व मनपा आरोग्य विभागाला प्रत्येकी ५०० किट प्राप्त झाले आहेत. मात्र प्रयोगशाळा व तांत्रिक प्रशिक्षणा अभावी ‘अँटीजेन टेस्ट’रखडली होती़ आता असे होणार नाही़धुळ्यात कोरोना निदानाच्या अँटिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे़ डॉ़ विशाल पाटील हे अँटिजेन चाचणी घेत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे