२० रोजी दुपारच्या सुमारास सांगवी फाट्यानजीक हा अपघात झाला होता़ मालट्रक क्रमांक आरजे-०९-जीसी-३८७१ सेंधवाकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येत असतांना पुढे साईडने जाणारी दुचाकी गाडी क्रमांक एमपी-४६-एमडी-९३१ हिस मागून ठोस दिल्याने दुचाकीवरील सावण संभू पावरा (१८) रा़ आसराणपाणी, करणसिंग सखाराम पावरा (३०) रा़ हातेडपाडा व अमित करणसिंग पावरा (५) रा़ हातेडपाडा ता़ शिरपूर हे तिघे गंभीर दुखापती झाले होते़ अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला होता़ तिघे जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असतांना सावण पावरा व करणसिंग पावरा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर दुखापती अमित यास तातडीने अधिक उपचारासाठी धुळे हलविण्यात आले़
याबाबत रावण नेवा पावरा (२०) रा़ हातेडपाडा ता़ शिरपूर याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक शंकरलाल गिरधारीलाल (५९) रा़ चंदेब्दिया ता़ जि. चित्तोडगड (राजस्थान) हल्ली कचनारिया ता.गंगराळ जि. चित्तोडगड याच्या विरोधात सांगवी पोलिसात मोटार अपघात नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास हवालदार राजेंद्र लांडगे हे करीत आहेत़