लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील आर्वी शिवारातील उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून ती धरणगाव तालुक्यातील मुसळी गावाची राहणारी असून तिचा वायरने गळा आवळून खून केल्याप्रकरणी तिच्या पतीविरोधात रविवारी दुपारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते शनिवारी दुपारी ३ वाजेदरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी येथील उड्डाण पुलाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदर अनोळखी महिलेचा तपास लागला असून तिचे नाव सविता जितेंद्र सोनवणे (३२) रा़ मुसळी ता़ धरणगाव जि़ जळगाव आहे़ चारित्र्याचा संशय घेवून पती जितेंद्र अमृत सोनवणे (रा़ मुसळी ता़ धरणगाव जि़जळगाव) याने वायरने गळा आवळून तिचा खून केला. आणि मृतदेह हा आर्वीच्या पुलाजवळ फेकून दिला. कारण सविताने सहा महिन्यापूर्वी पतीविरुद्ध पोलिसात विनयभंगाची फिर्याद दाखल केली होती. त्या गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ शकते या भीतीनेच पती जितेंद्र सोनवणेने हा खून केल्याची फिर्याद मालेगाव येथील मयत महिलेची आई लताबाई काशिनाथ ढिवरे हीने रविवारी दुपारी साडेचार वाजता तालुका पोलिसात दिली आहे. फिर्यादीनुसार तालुका पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे जितेंद्र सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही़ ओ़ वसावे करीत आहेत़ दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे़
आर्वी शिवारातील महिलेच्या खुनप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:40 IST
आर्वीनजिकची घटना : महिलेचा मृतदेह आढळल्याप्रकरणी
आर्वी शिवारातील महिलेच्या खुनप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देआर्वीनजिक उड्डाण पुलाजवळ सापडला होता महिलेचा मृतदेहसुरुवातीला अकस्मात मृत्यूची झाली होती नोंद, नंतर लागले वाढीव कलमधुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल