शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : ३५५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:45 IST

धुळे महापालिका निवडणूक : २ हजार २५० कर्मचारी केंद्रांवर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठी ३५५ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान होणार असून त्यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.कर्मचाºयांना मतदान साहित्य वाटप रविवारी ४६९ मतदान केंद्रांमध्ये मतदानसाठीची व्यवस्था करण्यात आली. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २ हजार २५० कर्मचाºयांना मंगळवारी सकाळी ९ ते ३ वाजेदरम्यान नगाव बारीजवळील शासकीय गोदामामध्ये मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी केल्यानंतर मतदान साहित्याचे वाटप करून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून कर्मचारी हजरमतदान साहित्य घेण्यासाठी सर्व कर्मचाºयांना सकाळी  ७ वाजेपासून बोलाविण्यात आले होते. तसेच सर्व कर्मचाºयांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची तपासणी मनपा अधिकाºयांनी करून घेतली. त्यानंतरच कर्मचाºयांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सहा निवडणूक कार्यालयातील  निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस, विक्रम बांदल, शरद पवार, संजय गायकवाड, गणेश मिसाळ, रामसिंग सुलाने यांनी सर्व साहित्य वाटपाचा आढावा घेत, प्रत्यक्ष पाहणी देखील केली. तीन टप्प्यात साहित्याचे वाटप सर्व कर्मचाºयांना सकाळी ९ ते ११, ११ ते १२ व दुपारी १ ते ३ अशा तीन टप्प्यात साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या ४० बसेसद्वारे मतदान केंद्रावर सर्व कर्मचाºयांची रवानगी करण्यात आली.  मतदानाच्या दिवशी अधिकारी व  कर्मचाºयांसाठी शासकीय व खासगी अशा १३२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, आचारसंहिता कक्षाच्या पथकासह ६ पथके रविवारी दिवसभर शहरातील प्रत्येक भागात पाहणी करणार आहे. अशी करण्यात आली आहे कर्मचाºयांची नियुक्ती४५० मतदान केंद्रासाठी २ हजार २५० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई, तर मुस्लीम बहुल भागातील केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ महीला अधिकारी व शिपाई यांचा समावेश आहे. त्यानंतर  प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी  १ पुरुष व १ महिला पोलीस नियुक्त करण्यात आला  आहे. उमेदवारांच्या माहितीचे फलकही मतदान केंद्रांवर लावणारयंदा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागांमध्ये जे उमेदवार उभे आहेत. अशा सर्व उमेदवारांची संपत्ती, शिक्षण व गुन्हेगारी पार्श्वभूमी या बाबतच्या माहितीचे फलक मतदान केंद्रावर लावण्यात आले आहेत. मतदारांना उमेदवारांची माहिती होण्यासाठी हे फलक लावल्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक