लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शेतकरी संघटनेचे १४वे अधिवेशन शिर्डी येथे होत असून, या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मंगळवारी दुचाकी, व इतर वाहनांनी शिर्डीकडे रवाना झाले. शेतकरी संघटनेचे अधिवेशन १० ते १२ डिसेंबर दरम्यान होत आहे.या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आज देवभाने गावापासून शिर्डीकडे दुचाकीने रवाना झाले. या रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी आपल्या गाडीवर शेतकरी संघटनेचा ध्वज लावलेला होता. या रॅलीचे नगाव चौफुलीवर स्वागत करण्यात आले. त्याठिकाणाहून संतोषीमाता चौक मार्गे ही रॅली पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. या अधिवेशनात राष्टÑीय अध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप आदी मार्गदर्शन करणार आहेत, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी, शांतूभाई पटेल, आत्माराम पाटील, पी.डी. देवरे, तुळशीराम माळी, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकरी अधिवेशनासाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:52 IST