शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शेतक:यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By admin | Updated: April 14, 2017 00:35 IST

कजर्मुक्ती, स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी :खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती, शेकडोंचा सहभाग

नंदुरबार : कजर्मुक्तीसह स्वामिनाथन आयोग लागू करावा, पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले.सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी नाटय़मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी यांनी केले. रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. या वेळी खासदार शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. कजर्मुक्ती झालीच पाहिजे, असा ठाम निर्धार करीत स्वामिनाथन आयोग शेतक:यांच्या हिताचा कसा आहे हे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून अनियमित पजर्न्यमान, शेतमालाला मिळणारा कमी भाव, महागडे बियाणे, खते, मजुरीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी कजर्बाजारी होत चालला आहे. बँकांसह खासगी सावकारांचेही कर्ज त्याच्यावर थकीत आहे. त्यामुळे कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आहे. आता कजर्माफी मिळाली नाही तर शेतक:यांचे        जिणे कठीण होऊन बसेल.        त्यामुळे लवकरात लवकर कजर्माफी करून शेतक:यांचा सातबारा कोरा करावा.जिल्ह्यात शेतमालाच्या किरकोळ चो:या सुरुवातीपासूनच सुरू आहेत, परंतु गेल्या पाच-सहा वर्षात एक विघातक वृत्ती पसरत चालली आहे. उभी पिके कापून फेकणे, टय़ूबवेल, विहीरमधील केबल कापून फेकणे, पाईप चोरणे अशा घटना घडत आहेत, परिणामी शेतकरी हैराण झाला आहे. या विघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. परिसरातील शेतक:यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांना कडक निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.जिल्ह्यातील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना तत्कालीन सत्ताधा:यांनी शेतकरी, सभासदांच्या संमतीशिवाय खासगी कंपनीला विकला. कारखाना पुन्हा शेतकरी-सभासदांच्या ताब्यात मिळावा,  कारखान्याचा लिलाव ज्यावेळी करण्यात आला तेव्हा त्या कारखान्याच्या सभासदांचा किंवा कारखान्याचे इतर शासकीय बँक व शासकीय देणे किंवा कर्मचा:यांचाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सर्व संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशीही मागणी यात करण्यात आली आहे.याशिवाय जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला   पाणी मिळावे, शेतीसाठी 24 तास  वीज मिळावी, शेतक:यांना    घटनेनुसार संरक्षण मिळावे आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या वेळी मुकुंद प्रल्हाद चौधरी, नथ्थू पाटील, कृष्णदास सखाराम पाटील, वसंत पाटील, प्रवीण    पाटील, मोहन पटेल, गोरख       पाटील, पोपटभाई पाटील, विलास कोकणी, विनायक पाटील, रमेश पाटील, अॅड. प्रमोद पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.    काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही सहभागी..काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची शेतकरी संघर्ष यात्रा रविवार, 16 एप्रिल रोजी नंदुरबारात येत आहे. त्याची तयारी सुरू आहे. आजच्या मोर्चातदेखील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर सहभागी असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनीदेखील काही वेळ मोर्चात सहभाग घेतला.रणरणत्या उन्हात अर्थात 41 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवाजी नाटय़मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय हे अंतर तीन ते साडेतीन किलोमीटर आहे. एवढय़ा उन्हात आणि एवढे अंतर चालत गेल्यानंतरही शेतक:यांचा उत्साह कायम होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यावर तेथे मिळेल त्या झाडाच्या सावलीखाली शेतकरी बसले होते. खासदार राजू शेट्टी व पदाधिकारीदेखील एका झाडाच्या सावलीचा आसरा घेत बसले. मोर्चादरम्यान शेतक:यांना पाणी पाऊच वाटप करण्यात आले.