शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेतकऱ्याच्या बोअरवेल आले विनापंप पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:33 PM

गावातील १५ ते २० बोरवेल वाहताय ओसंडून

कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावातील बिलाडी रोडलगत असलेले शेतकऱ्यांचे बोरवेल हे तब्बल एका महिन्याभरापासून पाच ते सात फूट उंच पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत़ यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच वेळेवर व समाधानकारक पाऊस होत असल्याने यात अधिक भर म्हणून गेल्या आॅगस्ट महिन्यात सतत पावसाची रिपरिप सुरू होती़ जिल्हाभरातील कापडणे गावासह बºयाच ठिकाणी गेल्या आॅगस्ट महिन्याभरापासून कधी मुसळधार तर कधी भीज पाऊस सातत्याने सुरू होता यामुळे जमिनीतील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वर आलेली आहे.गावातील दोन बोरवेल जमिनीवरून आपोआप वाहत आहेत़ तर अनेक बोरवेल व विहिरींची जलपातळी जमिनीच्या अगदी चार ते पाच फुटावरती आलेली आहे. कापडणे गावातील बिलाडी रोडजवळ नितीन बाबुराव माळी, चुडामण बाबुराव माळी या शेतकºयांच्या मालकीचे वेगवेगळ्या ठिकाणी तीन बोरवेल आहेत़ पैकी यातील दोन बोरवेल पाण्याअभावी फेल झालेले होते व उर्वरित एक बोरवेल ४०० फूट खोलीवरून मात्र तब्बल एका महिन्याभरापासून कोणत्याही इलेक्ट्रिक मोटार पंप शिवाय पाच ते सात फूट उंच जमिनीच्या वरती बोरवेलचे पाणी मोठ्या प्रेशरने आपोआप बाहेर पडत आहे़ या बोरवेलचे पाणी तब्बल एका महिन्यापासून रात्रंदिवस भूपृष्ठावर ओसंडून वाहत आहे.येथील परिसरातच लांब अंतरावर शेतकरी सुरेश दयाराम (बोरसे) पाटील, अमोल सुरेश बोरसे यांच्या शेतात देखील बोरवेल असून हा बोरवेल देखील एक ते सव्वा महिन्यापासून विना मोटार पंपाचा पाण्याचा ओसंडून वाहत आहे. मागील गेल्या तीन ते चार वर्षे मोठा कोरडा दुष्काळ होता़ भूगर्भात पाण्याविना मोठी पोकळी निर्माण झालेली होती़ सध्या सततचा नियमित मुसळधार पावसानंतर कापडणे गावातील गेल्या तीन ते चार वर्षाचा कोरडा दुष्काळ कसा धुतला गेला, हे सांगणारे ज्वलंत दृश्य समोर आले आहे़ मात्र गेल्या वर्षाच्या खरीप हंगामाच्या अखेरच्या व परतीच्या सप्टेंबर आॅक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे व यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यापासूनच समाधानकारक पाऊस सुरू असल्याने त्यात अधिक भर म्हणून आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात सततचा कधी मुसळधार तर कधी रिपरिप स्वरूपाचा पाऊस सुरू होता़ यामुळे अतिरिक्त पाऊस होत असल्याने भूगर्भातील खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपलेली असल्याने त्याचवेळी पाणी जमिनीच्या वरती येतं, जिथे जिथे पोकळी मिळेल तिथून हे पाणी भूपृष्ठावर येत आहे. कापडणे येथील नितीन माळी व सुरेश बोरसे या शेतकºयांच्या बोरवेलमध्ये प्रत्येकी ३ एचपी इलेक्ट्रिक पंप होता़ परंतु अतिरिक्त पाऊस झाल्याने कोणत्याही पंपाशिवाय यांच्या बोरवेलमधून जवळपास पाच ते सात फूट उंच पाणी भूपृष्ठावर रात्रंदिवस गेल्या महिन्याभरापासून वाहत आहे़ निसर्गाची किमया व चमत्कार पाहण्यासाठी येथे मात्र दररोज बघ्यांची गर्दी वाढत आहे. मागील चार ते पाच वर्षापासून पावसाळा अत्यंत तुरळक होत होता़ त्या तुलनेने मात्र मागील वर्षापासून पावसाळा चांगला होत आहे़ यंदाही सुरुवातीपासून समाधान कारक व वेळेवर पाऊस होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक आटलेल्या बोरवेलमधून पाणीवर येऊ लागले आहे़ विहिरीच्या जलपातळीतही मोठी वाढ होत आहे़ आता मात्र शेतकºयांचा निघणारा उत्पादित मालाला सरकारने रास्त भाव दयावा जेणेकरून शेतकरी शेती कसण्यास तग धरू शकेल. असे सुरेश दयाराम बोरसे या शेतकºयाचे म्हणणे आहे़पावसाळा जर सप्टेंबर मध्येही असाच सलग सुरू असला तर गावातील १५ ते २० बोरवेल ओसंडून वाहत आहे़ बहुतांशी बोरवेलला अगदी तीन ते चार फुटांवरच जमिनीच्या वरती पाणी आलेले आहे़ जणू विहिरीही ओसंडून वाहतील की काय अशी परिस्थिती अतिरिक्त पावसामुळे झालेली आहे़ अतिरिक्त पावसामुळे पिकांची नासधूस होत आहे़ मात्र भूजल पातळी वाढल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़

टॅग्स :Dhuleधुळे