शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या स्वच्छतेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 22:18 IST

ठेकेदाराचे दुर्लक्ष : बांधकाम पक्के होण्यासाठी पूलावर पाणी टाकण्यात आले नसल्याचा आरोप

कापडणे : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कापडणे हद्दितील धमाणे रोडावर तब्बल दीड वर्षानंतर संथ गतीने पूल उभारला गेला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारीही सुरू झाली आहे. मात्र सदर केलेल्या पुलावर अनावश्यक वाळू व घाणीचा खच साचलेला आहे. यामुळे पडलेल्या वाळूवरून वाहने घसरून मोठा अपघात होण्याची भिती आहे. पुलाची साफसफाई करण्यात यावी यासाठी बुधवारी परिसरातील शेतकऱ्यांनी निषेधात्मक आंदोलन केले.पुलाचे काम विलंबाने केले मात्र अनेक समस्यांच्या गर्तेत पूल अडकला. पुलाचे काम होवून बरेच दिवस झाले मात्र त्यावरील अनावश्यक घाण उचलण्यास सदर ठेकेदाराकडून असमर्थता दिसून येत आहे. बांधकाम केलेल्या पुलावरती नियमित पाणी मारले गेले नाही अशी तक्रार येथील शेतकºयांची आहे. पुलावर बांधकाम करून उरलेली वाळू व पाणी टाकण्यासाठी बनविण्यात आलेले चौकोनी बंधारे काढले नसून मोठ्या प्रमाणात रेती व अनावश्यक कॉंक्रीटचे पक्के मटेरियल, पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाºया उरलेल्या खडीचे ढिगारे तसेच पडून आहेत.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाला आवश्यक तो दाब दिला गेला नसल्याने पुलाचा व रोडाचा उतार व्यवस्थित काढला गेलेला नाही. दोन्ही बाजूला मातीचा भराव अतिशय अरुंद असून समांतर केलेला नाही.पुलाच्या दोन्ही बाजूस डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण केलेले नसून संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर पुलावरून वाहने चालवत असताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना रात्री-अपरात्री अंधारात पुलाचा व रोडाचा अंदाज न आल्यास वाहने पुलावरून नाल्यात पडण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजुचे रस्ते अजूनही नादुरुस्त व अत्यंत खराब झालेले आहेत.सदर बांधकाम केलेल्या पुलावरील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात व पुलावरील घाण तात्काळ उचलावी यासाठी कापडणे येथील शेतकºयांनी पुलाचे काम करणारा सदर विभाग व संबंधित ठेकेदार विरुद्ध निषेधात्मक आंदोलन केले. या आंदोलनात कापडणे येथील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय वाघ, राजेंद्र शालिग्राम पाटील, मोहन खलाणे, आनंदा माळी, दत्तात्रय नथू वाघ, बबलू देसले आदी शेतकºयांनी आंदोलन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे