शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फरार दिनेश गायकवाड एलसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:21 IST

गोंदूररोडवर कारवाई : तालुका पोलिसांना सुपूर्द

ठळक मुद्देदेवपुरातील गोंदूर रोड भागातून फरार मद्यसम्राट दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाडला अटक़ धुळे एलसीबीने लावलेल्या सापळ्यात दिनू डॉन अडकला़ धुळे जिल्ह्यासह जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चंद्रपूर पोलिसांना हिसका देत फरार असलेला दिनू डॉन उर्फ दिनेश निंबा गायकवाड (३४) याला रविवारी दुपारी धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देवपुरातील गोंदूर रोडवरुन शिताफीने ताब्यात घेतले़ त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला धुळे तालुका पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दारु पुरविण्याबाबत धुळे जिल्ह्यातील मद्यसम्राट दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याचे नाव समोर आले होते़ त्यामुळे या प्रकरणाबाबत चौकशी करण्यासाठी आणि संशयित दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्यासह पोलिसांचे पथक २० आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील शिरुड गावात पोहचले़ त्याठिकाणी दिनेश गायकवाडची चौकशी करत असताना त्याच्यासह प्रवीण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली़ त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला़ शासकीय कामात अडथळा आणत दिनू डॉन हा फरार होण्यात यशस्वी ठरला होता़ तो देवपूर परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांना मिळाली़ लागलीच त्यांनी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुरातील गोंदूर रोडसह विविध ठिकाणी सापळा रचला़ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल हिरालाल ठाकरे, संदिप थोरात, गौतम सपकाळे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, आरीफ शेख, उमेश पवार, मनोज बागुल, मयूर पाटील, रवीकुमार राठोड, कविता देशमुख यांनी गोंदूर रोड भागात रविवारी दुपारी सापळा लावला आणि दिनू डॉनला अटक केली़ पुढील कारवाईसाठी त्याला धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ संशयित दिनेश गायकवाड याच्याविरोधात धुळे जिल्ह्यात चोरी, खंडणी मागणे, मारामारी करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, दारुची तस्करी करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत़ याशिवाय जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत़