शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट जीएसटी अधिकारी प्रकरण, दोन पोलिसांसह महिलेला अटक; महामार्गावर केली होती लूट

By देवेंद्र पाठक | Updated: February 1, 2024 15:52 IST

दोन्ही पोलिस तडकाफडकी निलंबित

देवेंद्र पाठक, धुळे: बनावट जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेचा समावेश असल्याचे चौकशीतून समोर आले. बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा. धुळे) आणि बिपिनची बहीण स्वाती रोशन पाटील (वय ३०) या तिघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंजाब येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (वय ५९) यांना मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्गावरून पीबी ११ सीझेड ०७५६ क्रमांकाचा ट्रक अनोळखी ४ जणांनी अडविला. आपण जीएसटी विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. १२ लाख ९६ हजारांच्या दंडाची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये गुगल पेच्या माध्यमातून स्वीकारून फसवणूक केली हाेती. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात ४ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक विश्लेषण करून बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा. धुळे) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली. तर, बिपिन याची बहीण स्वाती रोशन पाटील हीचेही नाव समोर आले. अधिक चौकशी केली असता ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तपास सुरू असून आणखी आरोपींची नावे समोर येऊ शकतात. दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून खाते निहाय चौकशी केली जाईल. या प्रकरणात आजवर जे ऑनलाइन व्यवहार झाले आहेत ते सर्वाधिक एचडीएफसी बँकेतील आहेत. बिपिन याची बहीण स्वाती ही पूर्वी एचडीएफसी बँकेत काम करत असल्याचे तपासातून समोर आले आहे, असेही पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Arrestअटक