शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती

By सचिन देव | Updated: April 26, 2023 21:18 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तीन दिवस विशेष मोहीम

धुळे: राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी धुळ्यासह राज्यभरात बेकायदेशीर बनावट गावठी  दारू अड्डे, हातभट्ट्या, तसेच विक्रेत्यांवर कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर, धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे २५ ते २७ एप्रिल असे तीन दिवस विशेष कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यामध्ये तालुकानिहाय चार पथकांची स्थापना करण्यात आली असून, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शिंदखेडा व धुळे तालुक्यात टाकलेल्या धाडसत्रामध्ये सहा ठिकाणी बनावट देशी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.तर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात सर्व ठिकाणी कारवाई मोहिम राबवून १२ गावठी दारू अड्डे उध्वस्त केले आहेत. दोन दिवसात असे १८ ठिकाणचे दारूअड्डे उध्वस्त केले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले.

धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाई मोहिमेसाठी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. आर. धनवटे, डी. एल. दिंडकर, बी. आर. लांजेकर, बी. एस. चौथवे या अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक शिंदखेडा, शिरपूर, साक्री व दोंडाईचा या भागात जाऊन कारवाई मोहीम राबवित आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी या पथकाने शिंदखेडा तालुक्यासह धुळे तालुक्यातील वरखेडी, आर्णी व हर्णी गावांमध्ये धाडसत्र राबवून दारू अड्डे उद्ध्वस्त केले.

तसेच देशी-विदेशी दारू, बिअर व व्यवसायासाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त करून एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तीन जणांना अटक केली आहे. तसेच दुसऱ्या दिवशींही साक्री व धुळे तालुक्यात कारवाई मोहिम राबवून अनेक ठिकाणचे दारू अड्डे उध्वस्त करून ४० हजारांच्या घरात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याचे समजल्यावर दारू उत्पादक मुद्देमाल सोडून पळत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, पसार होणाऱ्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाईचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागातर्फे बनावट देशी दारू अड्डे, हातभट्ट्या व इतर बेकायदेशीरपणे मद्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या गावांमध्ये असे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतील, तेथील नागरिकांनी राज्य उत्पादन शु्ल्क विभागाकडे माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवून, त्या गावातील बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात येतील.-मनोज शेवरे, अधीक्षक. धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग.

टॅग्स :Dhuleधुळेliquor banदारूबंदी