शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्जाची मुदत वाढवून शेतकऱ्यांना फेर कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:47 IST

काँग्रेसची मागणी : भाजपचेही निवेदन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या, घरकुलांची संख्या वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पिक कर्जाची मुदत वाढवून खरीप हंगामासाठी शेतकºयांना नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे़काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, पोपटराव सोनवणे यांच्यासह पदाधिकाºयांनी गुरुवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउनमुळे बळीराजा संकटात सापडला आहे़ २४ मार्चपासून लॉकडाउन केल्यामुळे शेतकरी ३१ मार्चपर्यंत पिक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत़ त्यामुळे आरबीयाने ३१ मेपर्यंत मुदत दिली़ परंतु सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत कायम असल्याने शेतकरी आताही कर्जाची परतफेड करु शकत नाहीत़ ज्या शेतकºयांनी कर्जाची परतफेड केली आहे त्यांना नव्याने कर्ज मिळत आहे़परंतु थकबाकीदार शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या शेतकºयांनी ३१ मेपर्यंत कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज मिळणार नाही़ त्यामुळे जुने कर्ज फेडण्यासाठी आरबीआयने दिलेली ३१ मेपर्यंतची मुदत पुन्हा वाढवून मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ ही मागणी आरबीआयल कळविण्याची विनंती केली आहे़दरम्यान, धुळे तालुक्यातील आर्वी गणाच्या पंचायत समिती सदस्या लता शेणगे यांनी पती जिभाऊ शेणगे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना गुरुवारी निवेदन दिले़बेमोसमी पावसामुळे आर्वी, अनकवाडी आणि परिसरातील इतर गावांच्या शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरु होत असल्याने या हंगामात शेतीची मशागत आणि पेरणी तसेच खते खरेदीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता नुकसान भरपाई त्वरीत मिळावी अशी मागणी केली आहे़ पंचायत समिती सदस्या लताशेणगे यांनी आणखी एक निवेदन दिले असून अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी घरकुलांची संख्या वाढवून मिळण्याची मागणी केली आहे़धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महिन्याभरानंतर धुळ्यात आल्याने विविध मागण्यांची निवेदने देण्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली होती़ खरीप हंगाम पूर्वतयारीची व्हीसीवरील आढावा बैठक झाल्यानंतर प्रशासकीय इमारतीमधून बाहेर पडलेल्या पालकमंत्र्यांनी चालतानाच निवेदन स्विकारली़

टॅग्स :Dhuleधुळे