शंकर मार्केटला लागलेल्या आगीने राैद्ररूप धारण केल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. मनपाकडे केवळ दोन सुस्थितीतील बंब असल्याने मोठी तारांबळ उडाली होती. त्यामुळे या आगीत २५ पेक्षा अधिक व्यापारी बांधवांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झालेला असताना पुन्हा मार्केटला आग लागून आर्थिक फटका बसला आहे. शहराचा विस्तार वाढलेला असतानादेखील मनपाकडे अनेक वर्षांपासून दोनच बंब आहेत. या घटनेचा बोध घेऊन मनपा प्रशासनाने देवपूर परिसरात नवरंग पाणीटाकी परिसरात एक सुसज्ज अग्निशमन केंद्र त्वरित कार्यान्वित करावे. तसेच निर्मिती होत नाही तोपर्यंत किमान दोन नवीन अग्निशमन बंबांची त्वरित खरेदी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन व्यापारी महासंघातर्फे मनपा प्रशासनाला दिले.
अग्निशमन यंत्रणेचे विस्तारीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST