लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागरिकांमधील देशभक्तीची भावना वृध्दिंगत व्हावी, तरुणांना सैन्य दलातील नोकरीच्या संधींची तर नागरिकांना नागरिकांना सैन्य दलाच्या जीवनाविषयी माहिती व्हावी म्हणून धुळयात ३० सप्टेंबरला राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ युध्द करणारे सैनिक, रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्र, बंदुका, बॉम्ब गोळे, हेलिकॉप्टर, घोडदळ, युध्दनौका याविषयी सर्वसामान्य नागरिकांना आकर्षण असते. याबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची नागरिकांची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर धुळयात प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे़ डॉग शो, अश्वदलाच्या कसरती, ब्यूटी द रिट्रिट हे कार्यक्रमही प्रदर्शनात होणार आहेत़ ‘आगे बढो’ असे या प्रदर्शनाचे नाव असणार आहे़ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी सैन्य दलाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या प्रदर्शनात जिल्हाभरातील तरूण वर्ग, शालेय व महाविद्यालयीन तरूण तरूणी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले़
धुळयात ३० रोजी सैन्य दलाचे प्रदर्शन- डॉ़ सुभाष भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:47 IST
पत्रकार परिषदेत माहिती, रणगाडे-विमाने होणार सहभागी
धुळयात ३० रोजी सैन्य दलाचे प्रदर्शन- डॉ़ सुभाष भामरे
ठळक मुद्दे- धुळयात प्रथमच आर्मीच्या प्रदर्शनाचे आयोजन- तरूणाईला मिळणार सैन्यदलाच्या भरतीची माहिती- प्रदर्शनात ४०० जवान होणार सहभागी