धुळे : शहरातील शिवतिर्थानजीकच्या सैनिक लॉन्स येथे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष, माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पार पडली. त्यात नुतन प्रदेशाध्यक्षपदी अॅड़ राजेंद्र डांगे यांची नियुक्ती करण्यात आली़धनगर समाज महासंघाचे मावळते प्रदेशाध्यक्ष आ. अॅड. रामहरी रूपनवर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी अॅड. चिमण उर्फ राजेंद्र डांगे यांची तर राज्य सरचिटणीसपदी सुनील वाघ (धुळे) यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष माजी आ. रामराव वडकुटे, माजी आ. पोपटराव गावडे, संतोष धनगर, बाळासाहेब शेळके, नारायण बोबडे, वासुदेव आरसकर, आप्पा दादा बागले, कोशाध्यक्ष पांडूरंग काकडे, विभागीय अध्यक्ष साहेबराव दीडवाघ, शिवाजी ढेपळे, अशोक देवकाते, पुरुषोत्तम दाकोळे, उपाध्यक्षपदी हरीभाऊ कोळेकर, विठ्ठलराव पातोळ यांची निवड करण्यात आली. बबनराव रानगे हे मल्हार सेनेचे नवीन सरसेनापती असतील. उपसेनापतीपदी धुळ्याचे अमोल मासुळे, शशिकांत तरगे, उमेश गुरडे यांची निवड करण्यात आली आहे. विभागप्रमुखपदी लखन गोराड, युवराज घोडे असतील. धनगर समाज महिला प्रदेशाध्यक्षपदी अल्काबाई गोडे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रेखाबाई न्हायहळदे विभागीय अध्यक्ष म्हणून प्रेमाबाई लव्हाळे, विठाबाई पाटील, नंदाबाई शेळके, शोभाबाई टोंगे यांची निवड झाली आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून अंकुशराव निर्मळ तर उपाध्यक्ष म्हणून सतीश सरग काम पाहतील. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अॅड. सुभाष सोनवणे, रामराव वरकुटे, श्रीराम पुंंडलिक, अल्का गोडे, पुष्पा गुरवडे आदी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी गोरख पाटील, तुषार गर्दे, लखन गोराड, मनोज गर्दे, शांताराम पाटील, अमोल मासुळे, मुकुंद अहिरे, चुडामण पाटील, संदीप खताळ, दीपक शेंडगे तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
धनगर महासंघाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 22:44 IST