धुळे : येथील शवगृहातून दोन मृतदेहांची परस्पर अदलाबदल झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली़ यावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला़ ठाकरे नामक दोन मृतदेहांच्या नावामुळे हा विचित्र प्रकार घडला़ एक मृतदेह धुळे तालुक्यातील जापी-शिरडाणे येथील असून दुसरा मृतदेह हा सोनगीर येथील होता़ या दोन्ही पैकी एकाची विल्हेवाट लावली गेली आहे़ दुसऱ्याची विल्हेवाट लावण्यापुर्वीच ही बाब उजेडात आली़अदलाबदलीची वस्तुस्थितीधुळ्यातील शवगृहातून दोन मृतदेहांची अदलाबदली झाली असल्याचे वृत्त खरे आहे़ पण, यासंदर्भात माझ्यापर्यंत आवश्यक ती कागदपत्रे आलेली नाही़ त्यामुळे आत्ताच यासंदर्भात अधिक माहिती देवू शकत नाही, अशी भूमिका शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ दुपारी यासंदर्भात एका गटातील काही जणं पोलीस ठाण्यात आले होते़
धुळ्यात दोन मृतदेहांची अदला-बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 17:02 IST