शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात कॉपीचे तुरळक प्रकार वगळता परीक्षा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:01 IST

४४ केंद्रावर २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट, पाच विद्यार्थ्यांवर कारवाई

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४४ केंद्रावर परीक्षासर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीतभरारी पथकांनी दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षापासून कडक पाऊले उचलण्यात आलेली आहेत. असे असले  कॉपीचे तुरळक प्रकार घडलेच. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. उर्वरित सर्वच केंद्रावर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.इयत्ता १२ वीची बुधवारपासून बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ४४ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली असून  जिल्हयात बारावीचे पाच उपद्रवी केंद्र आहेत. धुळे शहरातील सात केंद्रावर परीक्षा होत आहे.आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. परीक्षा मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आहे.  यावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.एकाही विद्यार्थ्याला उशिर नाहीयावर्षी ११ वाजेनंतर परीक्षा केंद्रात येणाºया विद्यार्थ्याला पेपरला बसू न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात एकाही केंद्रावर विद्यार्थी उशिरा आले नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.कॉपीचे तुरळक प्रकारसर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. ११ वाजेनंतर केंद्राचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने, कोणालाही आत जाणे शक्य होत नव्हते. पोलीस तैनात असल्याने, बाहेरून कॉपी देण्याच्या प्रकारालाही बºयापैकी आळा बसला होता. मात्र काही परीक्षार्थींनी आत जातांनाच सोबत कॉपी नेली होती. कॉपी झाल्यानंतर त्या खिडकीतून बाहेर फेकण्यात येत होत्या.एकास पकडलेशहराबाहेर असलेल्या एका केंद्रावर परीक्षार्थीला कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया इसमाला पोलिसांनी पकडून ‘प्रसाद’ दिल्यानंतर सोडून दिले.समर्थकांची गर्दीदरम्यान कॉपी पुरविण्यासाठी काही परीक्षार्थींच्या मित्रांनी केंद्राजवळच गर्दी केलेली होती. त्यांना हुसकावून लावतांना पोलिस, होमगार्डांना मात्र कष्ट घ्यावे लागले.काही केंद्राजवळच विद्यार्थ्यांनी फेकलेल्या कॉप्या जाळून टाकण्याचाही प्रकार घडला.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.