शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीच्या जोरावर एव्हरेस्ट मोहीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:17 IST

सर्व बाबींमध्ये पात्र ठरल्याने चंद्रकला गावित यांची झाली निवड

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवादविशाल गांगुर्डेएव्हरेस्ट मोहीम यशस्वी करण्याची प्रबळ इच्छा, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत उराशी बाळगली़ परिणामी  चंद्रकला गावित यांनी यश मिळविले़ त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला़  प्रश्न : माऊंट एव्हरेस्टवर चढाईची संधी कशी मिळाली?गावित : आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य, सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी शौर्य मिशन २ राबविण्याचे ठरविले़ प्रकल्प अधिकारींमार्फत कळविण्यात आले़ इयत्ता, खेळाडू आणि अनुषंगिक बाबींमध्ये पात्र ठरल्याने एव्हरेस्ट चढाईची संधी मिळाली़ प्रश्न : पायथ्यापर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष एव्हरेस्टची चढाई याचा अनुभव कसा राहिला?गावित : माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी वर्धा, तेलंगणा, दार्जिलिंग, सिक्कीम, लेह-लडाख याठिकाणी        प्रशिक्षण घेण्यात आल्याचा फायदा झाला़ या ठिकाणच्या प्रशिक्षणात यशस्वी ठरली़ एव्हरेस्ट सर करताना आलेला अनुभव अप्रतिम असून तो मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही़ प्रश्न : माऊंट एव्हरेस्ट किती दिवसांत सर केले?गावित : काठमांडूमार्गे चीनमधून मी १९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चढण्यास सुरुवात केली़ आनंद, उत्साह असताना मनात थोडी भीती होती़ सर्वांच्या आशिर्वादाने मी २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एव्हरेस्टवर पोहचून भारताचा तिरंगा फडकविला आणि तो क्षण मी माझ्या मनात साठवून ठेवला आहे़ प्रश्न : शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराबाबत आपण काय सांगाल?गावित : एव्हरेस्ट सर केल्याबद्दल माझा आणि माझ्या परिवाराचा सन्मान करण्यात आला आहे़ राज्य शासनाकडून याकामी २५ लाखांचा निधीची मिळाल्याबद्दल मी शासनाच्या ऋणात राहू इच्छिते़ मला मिळालेल्या पैशांतून माझ्या भाऊ-बहिणीचे शिक्षण पूर्ण करणार आहे़ आई-वडीलांच्या पुण्याईमुळे मला हा निधी मिळाला असल्याचे समाधान आहे़ निधीचा योग्य विनियोग करेल़ क्रीडा क्षेत्रात यश मिळवेल  मला उच्च शिक्षण घ्यायचे आहे़ माझी आवड क्रीडा क्षेत्रात असून त्यात प्रगती करण्याचा मानस आहे़ शिक्षण घेऊन समाजासाठी नागरीकांसाठी काम करण्याची इच्छा आहे़ समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा मार्गदर्शन करणार आहे़  मी स्वत: शिकणार असून माझ्यासोबत इतर सर्व विद्यार्थ्यांनाही शिकवेल़ परिणामी साक्री तालुक्यातील महूपाडा या गावाचा सर्वांगिण विकास साधला जाईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे़ जीवनामध्ये काहीही अशक्य नाही, असे माझे मत आहे़ वडिलधाºयांचा आशिर्वादमाझी स्वत:ची जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर न डगमगता, न घाबरता एव्हरेस्ट शिखर पार केले आहे़ वडील उत्तम गावित, आई कमलबाई यांच्यासह नातेवाईक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले़ 

शासनाकडून मिळालेल्या २५ लाखांच्या निधीतून माझे भाऊ- बहिण, आई-वडिलांसाठी विनियोग करेल़ - चंद्रकला गावित

टॅग्स :DhuleधुळेPimpalnerपिंपळनेर