शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७५ वर्षानंतरही... प्रसूतिकळा सुरू झाल्यावर झोळीतून 6 किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 07:24 IST

सातपुड्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेपासून वंचितच

लोकमत न्यूज नेटवर्कबोराडी (जि. धुळे) : शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायतीतील  थुवाणपाणी गावात रस्त्याची सोय नसल्याने प्रसूतीकळा सुरु झालेल्या महिलेला बांबूची झोळी करून सहा किलोमीटरची पायपीट करत गुऱ्हाळपाणी येथे आणून  वाकवाड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी  घडला. याठिकाणी प्रसूती झाली असून बाळ आणि महिला दोघे सुखरूप आहेत.

शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवाणपाणी व निशाणपाणी या गावात  जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. शनिवारी या गावातील लालबाई मोतीराम पावरा (३४) या गरोदर महिलेला प्रसूतीकळा होऊ लागल्याने तिला प्रसूतीसाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी बनवून तिला निशाणपाणी ते थुवाणपाणी आणि तेथून गुऱ्हाळपाणी असे ६ किलोमीटरचे अंतर पायपीट करत आणले. त्यानंतर तेथून या महिलेला रुग्णवाहिकेने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिची सुरक्षितरीत्या प्रसूती होऊन बाळ झाले. बाळ आणि त्या महिलेची प्रकृती ठीक आहे.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.

सीईओंच्या भेटीनंतरही हालचचार महिन्यापूर्वी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना देखील थुवाणपाणी पर्यंत पायी चालत यावे लागले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही रस्त्याबाबत काही कार्यवाही न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायमच आहे. 

गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दहा ते बारा खेडी येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र, याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही. - राजेंद्रसिंग पावरा, माजी ग्रामपंचायत सदस्य, गुऱ्हाळपाणी

टॅग्स :Womenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाDhuleधुळे