वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
म्हसदी : बिबट्याच्या उपद्रवाला कंटाळलेल्या म्हसदीसह परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे धाव घेतली आहे. म्हसदी, ककाणी, भडगाव, राजबाई, शेवाळी, काळगाव, विटाई, चिंचखेडे, बेहेड, वसमार, धमनार आदी गावांच्या परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पशुधन फस्त करणारा बिबट्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन विभागाने बिबट्यासह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पाण्याची नासाडी वेळीच रोखायला हवी
धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे नियोजन तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे असले तरी तांत्रिक कारणामुळे अनेक भागात वेळेत पाणीपुरवठा होत नाही. त्यातच शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहे. तसेच काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत असते.