लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै़ कर्मवीर डॉ़ पा़ रा़ घोगरे विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत कॅट २०२० अर्थात केमिस्ट्री अॅबिलीटी टेस्ट घेण्यात आली़ पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत ही परीक्षा झाली़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत धुळे़, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याच्या महाविद्यालयातील ७३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ मोबाईलवर आॅनलाईन झालेल्या या परीक्षेत ७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ मोबाईलवर त्वरीत परीक्षेचा निकाल आल्याने विद्यार्थी आनंदीत झाले़रसायनशास्त्राचा प्रचार, प्रसार, उपयोग आणि नवयुवकांमध्ये या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली़परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ़ एम़ व्ही़ पाटील, विभागप्रमुख डॉ़ जे़ टी़ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा़ के़ एम़ बोरसे, डॉ़ आऱ जी़ महाले, प्रा़ सविता पाटील, डॉ़ प्रियंका शिसोदे, डॉ़ एस़ एम़ कोष्टी, प्रा़ प्रशांत पाटील, प्रा़ अनिल पाटील, प्रा़ धिरज बच्छाव, प्रा़ अतुल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ डॉ़ चेतन पाटील समन्वयक होते़विद्यापीठाने राबविलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला़ यावरुन विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्र आणि पर्यावरणाच्या बाबतीत जिज्ञासा असल्याचे जाणवल्याची माहिती घोगरे महाविद्यालयातील विभाग प्रमुखांनी दिली़
घोगरे महाविद्यालयात पर्यावरणपूरक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:39 IST