आॅनलाइन लोकमतधुळे : दिल्ली येथे ३० हजारी कोर्टाच्या आवारात वकीलांवर झालेल्या हल्याचा धुळे बार असोसिएशनने निषेधाचा ठराव पारित करून वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केली. तसेच वकिलांनी बुधवारी दिवसभर लाल फित लावून कामकाज केले.दिल्ली येथील ३० हजारी कोर्टात वकील व पोलिस यांच्यात पार्किंगचा वाद उफाळला. त्यात पोलिसांनी वकिलांवर प्राणघातक हल्ला करून गोळीबार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्टÑ आणि गोवा वकील संघाच्या मार्गदर्शनानुसार धुळे जिल्हा वकील संघाचे आज सकाळी निषेध सभा घेतली. त्यात दिल्लीतील घटनेचा निषेधाचा ठराव पारित केला. घडलेल्या प्रकाराबाबत वकिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करा अशी मागणी करण्यात आली.जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष अॅड. मधुकर भिसे, सचिव अॅड. विवेक सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.
वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:10 IST