शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटलबरोबर स्वयंअध्यापनावर जास्त भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 11:46 IST

वान्मथी सी. : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराप्रसंगी प्रतिपादन

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे चार शिक्षकांचा गौरवसन्मानपत्र, शाल, श्रीफळ देवून केला गौरव

आॅनलाइन लोकमतधुळे : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांच्या क्षमता, विषयाची आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिकविण्यासाठी डिजीटलबरोबरच स्वयंअध्यापनावर जास्त भर द्यावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी व्यक्त केली.प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून वान्मथी सी. बोलत होत्या. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, निरंतरचे शिक्षणाधिकारी नरेंद्र खंडारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात राजेंद्र विक्रम भामरे (दह्याणे,ता. धुळे), पावबा धनजी बच्छाव (वाजदरे,ता. साक्री), गोकूळ पोपटराव पाटील (चुडाणे, ता. शिंदखेडा), वासुदेव रामदास चाचरे (बभळाज,ता. शिरपूर) या शिक्षकांना मान्यवरांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षकांनी आपल्या परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला.संदीप माळोदे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शिक्षकांनी डिजीटल ऐवजी स्वत: शिकवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. विद्या पाटील, हेमंत भदाणे यांच्यासह आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे यांनी केले. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण