शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

डीजिटलसह स्वयंअध्यापनावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:02 IST

वान्मथी सी. : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी प्रतिपादन

धुळे : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांच्या क्षमता, विषयाची आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिकविण्यासाठी डिजीटलबरोबरच स्वयंअध्यापनावर  जास्त भर द्यावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज येथे व्यक्त केली. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट कार्य करणाºया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना  जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून वान्मथी सी. बोलत होत्या. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, निरंतरचे शिक्षणाधिकारी नरेंद्र खंडारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राजेंद्र विक्रम भामरे (दह्याणे,ता. धुळे), पावबा धनजी बच्छाव (वाजदरे,ता. साक्री), गोकूळ पोपटराव पाटील (चुडाणे, ता. शिंदखेडा), वासुदेव रामदास चाचरे (बभळाज,ता. शिरपूर) या शिक्षकांना मान्यवरांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षकांनी आपल्या परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला.मी आज मुख्य कायकारी अधिकारी म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी म्हणून बोलते असे सांगून वान्मथी सी. यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. आपल्याला प्रत्येक शिक्षकाकडून खूप काही शिकायला मिळाले. विद्यार्थी भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात.  प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना समजेल, त्या विषयाबद्दल त्यांना आवड निर्माण होईल, अशा पद्धती अध्यापन करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. जिल्ह्यात डिजीटल शाळा सुरू झाल्या. त्याचा उपयोग गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व मुलांना आकर्षिक करण्यासाठी करणे गरजेचे आहे. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वत: शिकवावे. प्रत्येक विषय त्यांना समजवून सांगावा.संदीप माळोदे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शिक्षकांनी डिजीटल ऐवजी स्वत: शिकवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. विद्या पाटील, हेमंत भदाणे यांच्यासह आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस. रणदिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी शशिकांत साळुंखे, प्रशासन अधिकारी थोरात, रंजना साळुंखे, सी.के.पाटील, रेखा पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे