चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आकस्मिक आणि निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात आंतररुग्ण म्हणून उपचार घेतल्यास त्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती गतीने होणार आहे़ सेट्रल गव्हन्मेंंट हेल्थ स्क्रीम (सीजीएचएस) च्या पॅकेज अंतर्गत हा खर्च जिल्ह्यातील ११ हजार विमाधारकांच्या ४४ हजार कुटुंबीयांना मिळणार आहे़राज्य कामगार विमा महामंडळातर्फे ‘सीजीएचएस’ पॅकेज दराप्रमाणे विमाधारकांच्या वैद्यकीय खर्च प्रकरणाचा निपटारा केला जातो़ मात्र, काहीवेळा विमाधारक हे विमा महामंडळासमवेत करार असलेल्या तसेच इतर विविध खासगी रुग्णालयात उपचार घेतात़ अनेकदा एकच आजार, शस्त्रक्रिया उपचाराचा खर्च हा रुग्णालयनिहाय वेगवेगळा असतो़ त्यामुळे वैद्यकीय खर्च प्रकरणास विलंब लागतो़ शिवाय विमाधारकांनी खर्चाची रक्कम मिळण्यात तफावत होते़ ते लक्षात घेऊन वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणांमध्ये एकसमानता, सुसूत्री करण आणि जलदगतीने निपटारा करण्यासाठी ‘सीजीएचएस’ पॅकेज नुसार दिला जाणार आहे़ या निर्णयाची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होणार आहे़जिल्ह्यात चार रुणालयधुळे जिल्ह्यात चार ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत़ त्यात लहान आजारांवर उपचार होण्यासाठी धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कामगार विमा रुग्णालय व शिरपूर येथील श्रीसेवा रुग्णालयात व्यवस्था केली आहे़ तर मोठे व शस्त्रक्रिया होणाऱ्या धुळे शहरातील निरामय व ओम मल्टीस्पशलिस्ट रूग्णालयांचा समावेश केला आहे़जिल्ह्यात बहूसंख्य परजिल्ह्यातील कामगारचार तालुके व औद्यगिक दृष्या कमी विकास झाल्याने अन्य जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्यातील विमा लाभार्थी कमी आहेत़ औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेले बहुसंख्य लाभार्थी परराज्यातील आहे़विमाधारकांना दिलासा..यापूर्वी महामंडळाने करार केलेल्या रुग्णालयात कामगारांना वैद्यकीय सेवा दिली जात होती़ मात्र नव्या निर्णयामुळे आता कामगारांना आकस्मित प्रसंगी एखाद्या खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट होती़ त्यात बराच वेळ खर्च व्हायला़ आता खर्चाच्या प्रतिपूर्तीची गती वाढणार आहे़ त्याचा लाभ विमाधारकांना मिळणार असल्याने दिलासा मिळू शकतो़
आकस्मिक उपचारास मिळेल आता ‘सीजीएसएस’चा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:40 IST
खाजगी रुग्णालयांचा समावेश : जिल्ह्यातील ४४ हजार विमाधारक कामगारांना लाभ; राज्य कामगार विमा सोसायटीचा निर्णय
आकस्मिक उपचारास मिळेल आता ‘सीजीएसएस’चा खर्च
ठळक मुद्देजिल्ह्यात बहूसंख्य परजिल्ह्यातील कामगारविमाधारकांना दिलासा..जिल्ह्यात चार रुणालय जिल्ह्यातील ११ हजार विमाधारकांच्या ४४ हजार कुटुंबीयांना मिळणार लाभ