शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की टेलिफोनचीही केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:47 IST

रामवाडी शाखा : शहर पोलिसात गुन्हा दाखल

धुळे : झाड तोडण्यासाठी वीज प्रवाह खंडीत करण्याकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एकाने चक्करबर्डीतील वीज वितरण कंपनीच्या रामवाडी उपकेंद्राच्या कार्यालयात कर्मचाºयाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे़ यात टेलिफोनची देखील तोडफोड केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वीज वितरण कंपनीचे कर्मचारी योगेश पद्माकर सानप (२७, रा़ सुरत बायपास रोड, होंडा शो रुम जवळ, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे़ ते वीज वितरण कंपनीत तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत़ गेल्या चार वर्षापासून त्यांची नेमणूक चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळील रामवाडी उपकेंद्राच्या कार्यालयात आहे़ रविवार ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्यासह रमेश ठाकरे, प्रकाश जाधव, शशिकांत कुलकर्णी असे कार्यालयीन कामांत व्यस्त असताना कोळवले नगरातील रहिवाशी असलेले डॉ़ रघुवीरसिंग राजपूत नामक व्यक्ती आले़ त्यांनी घराजवळ असलेले झाड तोडावयाचे असल्याने विद्युत प्रवाह बंद करा, असे सांगितले़ त्यावर योगेश सानप यांनी त्यांना तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे रितसर अर्ज सादर करा, त्यांनी आम्हाला आदेशित केल्यानंतर आम्ही विद्युत प्रवाह बंद करतो, असे सांगितले़ मात्र, याचा राग आल्याने डॉ़ राजपूत यांनी वाद घातला़ तुम्ही येथे नोकरी कशी करतात, ते पाहतो, अशी धमकी देवून शिवीगाळ केली़ ते मारण्यासाठी अंगावर धावून आले़ शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ टेबलावरील फोन जमिनीवर आपटून फेकून नुकसान देखील केले़ शासकीय कामांत अडथळा निर्माण केला़ यावरुन डॉ़ रघुवीरसिंग राजपूत (रा़ भोलेबाबा नगर, मालेगाव रोड, धुळे) या संशयितांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी