शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वडजाईत वीज तार चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:34 IST

शेतकऱ्यांकडून चोरांचा पाठलाग : अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

वडजाई : गावात दोन दिवसापासून शेतातील इलेक्ट्रीक पोलवरील तार ४ रोजी चोरीस गेली होती. परंतु ५ रोजी रात्री दोन वाजता चोरटे पुन्हा तार चोरण्याचा प्रयत्न करीत असताना शेतातील रखवालदाराच्या लक्षात आले. त्याने दूरध्वनीद्वारे मालकाला कळविल्यानंतर लागलीच गावातून चारजण येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी अधारांचा फायदा घेत दुचाकीने पलायन केले.रात्री दोन वाजता चोर आणि शेतकऱ्यांमधील पळण्याचा थरार पाहावयास मिळाला. सलग दोन दिवस इलेक्ट्रीक तार चोरीस गेल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.वडजाई येथील डॉ.प्रशांत देवरे यांच्या शेतातील एक गाळा तार चोरट्यानी ५ रोजी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेताजवळील रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील खांबावरील तार रात्री दोन वाजता चोरटे कट करीत असतांना सालदाराच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मालक रामकृष्ण पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच कैलास बाविस्कर, सुनील देवरे यांनीे तीन ते चार शेतकºयांना उठवून ते शेताकडे निघाले. परंतु मोटारसायकलवरुन बरेच लोक येत असल्याचे पोलवर चढलेल्या चोरांच्या लक्षात आल्याने ते त्वरित खाली उतरून चोर आपल्या मोटारसायकलीने दोनजण पसार झाले तर एक जण कपाशी पिकांच्या साहारा घेत पसार झाला.यावेळी रात्रीचे तीन वाजले होते. शेतकºयांनी महामार्गापर्यंत त्यांचा पाठलाग केला. परंतु चोर पएलन जाण्यात यशस्वी झाले. ४ रोजी तीन गाळे तार चोरीस गेली व ५ रोजी पुन्हा प्रयत्न झाला. मात्र या चोरीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाही.वरिष्ठ अधिकाºयांना दूरध्वनीद्वारे शेतकºयांनी संपर्क केला असता कुणीही वरिष्ठांनी घटना स्थळाला भेट दिली नाही किंवा स्पॉट पंचनामा सुध्दा केला नाही.यानंतर कर्मचारी व लाईनमन आले असता वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगून मोकळे झाले. दहा दिवसापासून शेताची वीज बंद आहे. वारंवार दूरध्वनी करूनही वीज पुरवठा सुरू करीत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तार चोरीची खबर मोहाडी पोलिसांना रात्री तीन वाजता दूरध्वनीद्वारे देण्यात आली होती. त्यांनी लगेच दोन वाहने पाठविली. परंतु पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन करण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे