शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:19 IST

मतदानाची तयारी पूर्ण : आज साहित्य वाटप 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता संपला. रविवारी होणाºया मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन शनिवारी सायंकाळी सर्वच अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील.धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी साडे पाच वाजता थांबली.शक्ती प्रदर्शन - शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीतर्फे प्रभागातून प्रचार रॅली किंवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे सहभागी झालेत.लोकसंग्रामतर्फे एकत्ररित्या प्रचार रॅली काढण्यात आली. त्यात १९ प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या गाडया आणि शेवटी नदीकाठावरील झुलता पुलावर बसविण्यात येणारी शंकराची मूर्तीही ट्रॉलीवर आणण्यात आली होती. रॅलीत आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांच्यासह सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  भाजपतर्फे अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात माजी महापौर मंजुळा गावीत, डॉ.माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेतर्फे पेठ भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच पदाधिकारी व उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजेनंतर सर्वच प्रचार तोफा थंडावल्यात. शहरातील बॅनर, झेंडे काढले - सर्वच पक्षाने आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दुपारीच सर्वच बॅनर, झेंडे काढून घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे