शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील एकवीरादेवी मंदिर २४ तास उघडे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:59 IST

नवरात्रोत्सव : मंदिर परिसरात कॅमेरे बसविले, पोलिसांचा चोख बंदोबस्त,भाविकांसाठी विविध सुविधा

धुळे : शहर व जिल्ह्यात रविवारी आदिशक्तीचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात  वाजत गाजत स्वागत करण्यात आले. विविध मंडळांच्याठिकाणी संध्याकाळी  उशिरापर्यंत विधीवत पूजन करुन देवीची स्थापना करण्यात आली. दरम्यान मूर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केल्याने, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नवरात्रोत्सवात मंदिर २४ तास खुले राहणार आहे. तसेच मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली़मंदिरात घटस्थापनाखान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरातही रविवारी सकाळी विधीवत घटस्थापना करण्यात आली.  श्रीएकवीरा देवी व रेणूका माता मंदीर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याहस्ते पहाटे ५ वाजता सपत्नीक काकडा आरती झाली. दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.हजारो भाविकांनी घेतले दर्शनपहिल्या माळेलाच दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकवीरादेवी मदिंरात गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात खान्देश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक गर्दी करतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना २४ तास आई भगवतीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस, होमगार्ड व सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सायंकाळी अनेक मोठ्या मंडळांनी देवीच्या मूर्तींची वाजतगाजत मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.  यात महिलाही सहभागी झाल्या होत्या.विविध वस्तुंची खरेदीतर घटस्थापनेच्या शुभमहूर्तावर अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व  वाहनांची खरेदी केल्याने, बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली.घटस्थापनेचा मुहूर्तशहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडसह पुढे दत्त मंदिर, साक्रीरोडवरील जिल्हा रुग्णालय जवळ, फुलवाला चौक आदी परिसरात घटनस्थापनेचे पुजा साहित्य व दुर्गामूर्ती खरेदीसाठी नागरिकांची व विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळली होती. संध्याकाळीही अनेक भक्तांनी दूर्गादेवी मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली़ आग्रारोडवर गरबा, रास दांडिया, कीर्तन, भजन, पूजन, मंगलमय महाआरती यासाठीचे साहित्य, पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. दिवसातून होते पाचवेळा आरतीनवरात्रोत्सवाच्या काळात देवी भगवतीची दिवसातून पाच वेळा आरती करण्यात येते. पहाटे पाच वाजता काकडा आरती होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता, दुपारी १२ वाजता मध्यारती, संध्याकाळी सात वाजता आणि रात्री १२ वाजता शेवटची आरती करण्यात येत असते. या विविध आरत्यांचे इच्छुक भाविकांना यजमानपदही दिले जाते.गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेºयांची राहणार नजरमंदिराच्या आवारासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात. सध्याच्या स्थितीत १६ कॅमेरे सुरू आहेत. अजून पाच कॅमेरे लावण्यात येणार आहे. या एकूण २१ कॅमेºयांद्वारे परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.या सीसीटीव्ही कॅमेºयांचा मोठा फायदा होत असतो. नवरात्रोत्सवातील गर्दीच्या काळात मुले हरविणे, महिलांच्या पर्स चोरी जाणे आदी प्रकार घडत होते. मात्र सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे त्याला चांगलाच आळा बसला आहे.सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे सोयीस्कर झालेले आहे. जिल्ह्यात १८४ मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापनाजिल्ह्यात पोलीस ठाणे निहाय १८४ देवीच्या मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे त्यात धुळे शहर ३१, आझादनगर १४, देवपूर ५, पश्चिम देवपूर १०, मोहाडी १२, चाळीसगाव रोड २, साक्री ८, पिंपळनेर १५, सोनगीर १, धुळे तालुका १४, शिरपूर शहर ८, शिरपूर तालुका १३, थाळनेर १४, शिंदखेडा ५, दोंडाईचा १३ आणि नरडाणा १९ असे एकूण १८४ देवीच्या मुर्तीची संख्या आहे़ निजामपूरमध्ये मुर्ती नसून ५ ठिकाणी प्रतिमा ठेवून कार्यक्रम साजरा केला जाणार आहे़ आजपासून दांडियानवरात्रोत्सव म्हटला म्हणजे दांडिया, गरबा आलाच. दांडिया-गरबा खेळण्यासाठी शहरातील अनेक मंडळांनी जय्यत तयारी केलेली आहे. मैदानाचे सपाटीकरण करून, चमकी, विद्युत रोषणाई केलेली आहे. रविवारचा दिवस हा मूर्ती स्थापनेतच गेल्याने, बहुतांश मंडळात दांडिया-गरबा झाला नाही. मात्र, सोमवारपासून ठिकठिकाणी गरबा-दांडिया रास रंगणार आहे. गरबा-दांडिया खेळण्यासाठी तरूणी, महिलांकडून खास गुजराथी, राजस्थानी पेहराव खरेदी करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे