शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

एकनाथ खडसे यांनी केली धुळ्यात अमळनेरच्या ‘अन्याय’ रिक्षातून सवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:56 IST

अन्यायाची भावना : जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह जनमानसात चर्चा 

ठळक मुद्देविखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याबाबत न्याय मिळविण्यासाठी आत्महत्या करावी लागल्याची बाब दुर्दैवी आहे. मृत्यूनंतरही का होईना त्यांना सरकारने ५४ लाखांची मदत केली. यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र पुन्हा अशा पद्धतीने दुसºया कोणत्या शेतकºयाची गत धर्मा पाटील यांच्यासारखी होऊ नये, यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथील दौºयात व्यक्त केले. शेतकºयांसाठी तापी नदीवर सारंगखेडा, सुलवाडे व प्रकाशा बॅरेजेस बांधून तयार आहेत मात्र, त्यातील पाणी अद्याप शेतीबांधापर्यंत पोहचले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी शहरात येऊन मागे अन्याय फलक लिहिलेल्या रिक्षातून शहरातून सैर केली. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना येथील कार्यकर्त्यांसह जनमानसातही असून तशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. या दौºयात त्यांनी पक्षाचे दिवंगत कार्यकर्ते तुषार सराफ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.बुधवारी दुपारी सव्वाचार वाजता माजी मंत्री खडसे शहरात दाखल झाले. सध्या ते जेथे जातील तेथे अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत आहेत. तीच भावना कार्यकर्त्यांचीही असून त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी अमळनेर येथील कैलास चौधरी यांच्या रिक्षातून सवारी करत यावेळी शहरात फेरफटकाही मारला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर त्यांच्यासोबत  होते. चौधरी यांनी रिक्षाच्या मागे माजी मंत्री खडसे यांचे छायाचित्र व त्यावर अन्याय असे लिहिलेला फलकही लावला आहे. त्यामुळे या रिक्षातून प्रवास करताना त्यांच्यावरील अन्यायाची कार्यकर्त्यांमधील भावना अधोरेखीत झाली. नागरिकांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर त्यांनी आमदार अनिल गोटे यांनी साकारलेल्या शिवतीर्थास भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तेजस गोटे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे शहरातील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते तुषार सराफ यांच्या डोंगरे महाराज नगरातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नेरकर, भिमसिंग राजपूत, डॉ.माधुरी बोरसे, डॉ.विपुल बाफना, भारती माळी, रत्ना बडगुजर, योगेश मुकुंदे,किरण देशमुख, अमित खोपडे, चंद्रकांत गुजराथी, अमोल मराठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे येथील माजी जिल्हाध्यक्ष विनोद मोराणकर यांच्या घरी जाऊन माजी मंत्री खडसे यांनी त्यांची भेट घेतली. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते जळगावकडे रवाना झाले.