लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात मंगळवारी धुळे तालुक्यासह शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. शिरपूर येथे घरांची पडझड झाल्याने आठजण जखमी झाले. दरम्यान वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अंधार होता.शिरपूरशहरात सायंकाळी अर्धातास वादळी वाºयासह बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. बोराच्या आकारा एवढी गारपीट झाली. वादळामुळे काहींच्या घरांचा पत्रा उडाला, झाडे कोलमडलीत, अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे वीजपुरवठा देखील रात्री उशिरापर्यंत खंडीत होता. गारांचा पाऊस आठ ते १० मिनीटे झाला.सायंकाळच्या सुमारास करवंद नाका परिसरात भाजीपाला व कापड व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर फुटपाथवर गाडी लावून बसतात. अचानक जोराचा पाऊस झाल्यामुळे अनेकांचा भाजीपाला पाण्यात वाहून गेला. जोराच्या वादळामुळे झाडे कोलमडलीत तर काही झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या मात्र दुर्घटना टळली. काहींच्या घराचा पत्रा उडाल्यामुळे नुकसान झाले. यात उडालेलापत्रा अंगावर आल्याने आठजण किरोकोळ जखमी झाले. त्यात प्रेम गणेश शर्मा (४५, सावदळे), अमर वनवाली पावरा (२, रा. कळमसरे), विकास संतोष सोनवणे (६३, रा. शिंगावे), जितू ठावºया पावरा (५),वनवासºया तारासिंग पावरा (३०, रा. सुतगिरणी परिसर), लवलीबाई बाजा पावरा (३०, रा. सेंधवा), तारासिंग देवसिंग पावरा (३०, रा. सुतगिरणी परिसर), बाज्या रावजा पावरा (३०) यांचा समावेश आहे.थाळनेर - परिसरात मंगळवारी सायंकाळी ६.३० वजेच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. वादळामुळे झाडे पडल्याने विज पुरवठा खंडित झालो. अनेकांची घरांची पत्रे उडाली तर परिसरात बºयाच ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. उंटावद येथेही सायंकाळी वादळीवाºयासह पाऊस झाला.धुळे, साक्री, शिंदखेड्यातही पाऊसधुळे तालुक्यातील तिसगाव न्याहळोद व शहरात तुरळक प्रमाणात तर साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे, बळसाणे, म्हसदी आदी ठिकाणी पाऊस झाला. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घरांची पडझड झाल्याने आठजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:34 IST