शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिका स्थायी समितीचे  आठ सदस्य होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 19:39 IST

विरोधी पक्षनेतेपदी वैशाली लहामगे, महिला बालकल्याण समितीचीही फेररचना

ठळक मुद्देआठ सदस्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला होत आहे पूर्णवैशाली लहामगे यांची विरोधीपक्षनेतेपदी वर्णीमहिला बालकल्याण समितीही होणार फेररचना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे: मनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबरला पूर्ण होत असल्याने नवीन सदस्यांची निवड होणार आहे़ विरोधी पक्षनेते गंगाधर माळी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी वैशाली लहामगे यांची वर्णी लागली असून, लवकरच औपचारीक घोषणा होणार आहे़ त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समितीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या समितीची देखील फेररचना केली जाणार आहे़ इच्छुकांचा पाठपुरावा सुरूमनपाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या स्थायी समितीत १६ सदस्यांचा समावेश आहे़ त्यापैकी निम्म्या अर्थात ८ सदस्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०१७ ला पूर्ण होत आहे़ त्यामुळे नवीन सदस्यांची निवड होणार असून त्यासाठीची पूर्वप्रक्रिया नगर सचिव कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे़ स्थायी समितीतून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चार सदस्यांसह शिवसेना, काँग्रेसचा प्रत्येकी एक व शहर विकास आघाडीचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत़ त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आतापासून सदस्यत्वाची मागणी नोंदविण्यास सुरूवात केली आहे़ तर महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ २२ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने महिला बालकल्याण समितीची फेररचना केली जाणार आहे़ त्यासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विशेष महासभा होईल़ त्यानुषंगाने प्रत्येक पक्षात स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीसाठी इच्छुक असलेल्यांकडून आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जात आहे़विरोधी पक्षनेतेपदी लहामगेशिवसेनेचे गंगाधर माळी यांची ४ आॅक्टोबर २०१६ ला विरोधी पक्षनेते पदी निवड झाली होती़ त्यांना या पदावर एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्याने पक्ष पातळीवर नवीन विरोधी पक्षनेता निवडीच्या हालचाली सुरू होत्या़ त्यानुसार शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्या पत्नी वैशाली लहामगे यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली आहे़ त्याबाबत गटनेत्यांकडून महापौरांना पत्र दिले जाईल व अधिकृत घोषणा १२ डिसेंबरला केली जाईल़ असे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़सभापती पदांसाठीही रस्सीखेचस्थायी समितीसह महिला व बालकल्याण समितीत यंदा कुणाची वर्णी लागते हे अद्याप स्पष्ट नसले तरी सत्ताधारी पक्षाच्या काही इच्छुक सदस्यांनी थेट स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू केला आहे़ स्थायी समिती सभापतीपदी विद्यमान सभागृह नेते कमलेश देवरे यांचे नाव सध्या चर्चेत आहे़ मात्र कुणाची वर्णी लागते हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे़ तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाची माळ कुणाच्या गळयात पडते हे देखील येत्या काळात स्पष्ट होणार आहे़ हे सदस्य होणार निवृत्त़़़राष्ट्रवादीच्या मायादेवी परदेशी, ललीता आघाव, जैबुन्निसा पठाण, नाना मोरे, शिवसेनेचे संजय गुजराथी, काँग्रेसचे इस्माईल पठाण, शहर विकास आघाडीचे साबीर सैयद, चित्रा दुसाने.कहे सदस्य राहणार कायम़़सभागृह नेते कमलेश देवरे, यमुनाबाई जाधव, दीपक शेलार, कैलास चौधरी, गुलाब महाजन, शेख हजराबी महंमद, शिवसेनेतर्फे  जोत्स्ना पाटील आणि भाजपतर्फे वालीबेन मंडोरे.महिला बालकल्याण समितीचे विद्यमान सदस्य़़़वैशाली लहामगे, शकुंतला जाधव, मोमीन आतियाबानो दोस्त महंमद, कल्पना बोरसे, इंदुबाई वाघ, इंदुबाई बोरसे, चंद्रकला जाधव, अन्सारी अफजलुन्नीसा फजलु रहेमान, अन्सारी हलीमाबानो मोहम्मद शाबान, माधुरी अजळकर आणि प्रभावती चौधरी यांची महिला बालकल्याण समितीत गेल्या वर्षी निवड झाली होती़ समितीची दरवर्षी फेररचना होत असल्याने विद्यमान सदस्यांपैकी कुणाला आणखी संधी मिळते का? याकडे लक्ष असणार आहे़ गेल्या वर्षी ११ पैकी सहा सदस्यांना दुसºयांदा सदस्यत्व मिळाले होते़