या कालावधीत विवाह समारंभ पूर्णत: बंद होते. त्याचा परिणाम सोने-खरेदीवरही झाला. तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल २० ते २५ टक्के सोन्याची विक्री बंद झाली होती. मार्केटमधील कापड बाजारही बंदच होता. मार्च ते जूनपर्यंत बंद असल्याने, व्यापाऱ्यांना सीजन कॅच करता आला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते. कपड्यांच्या खरेदीतूनच लाखोंची उलाढाल होत असते. मात्र गेल्यावर्षी या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्यावर्षी झालेले नुकसान अद्यापही भरून निघालेले नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
वाहन बाजारातही मंदी
गुढीपाडवा, रामनवमी, यासारख्या सणांना वाहन खरेदी करण्यास अनेकजण प्राधान्य देत असतात. मात्र गेल्यावर्षी रामनवमी, गुढीपाड्याच्या दिवशीही वाहन विक्रीचे दुकाने बंद होते. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही नवीन वाहन खरेदी करता आली नाही. दरवर्षी वाहन खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. ती गेल्यावेळी ठप्प पडल्याचे दिसून आले अजूनही वाहन बाजाराने उभारी घेतलेली नाही.
कृषीक्षेत्रावर परिणाम नाही
दरम्यान एकीकडे सर्वच दुकाने बंद असली तरी कृषी केंद्र सुरूच होती. लाॅकडाऊनच्या कृषी क्षेत्रावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. शेती संबंधित सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे डाळ व्यापारालाही फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. जीवनावश्यकमध्ये डाळीचा समावेश असल्याने, पूर्वीप्रमाणेच मागणी होती. एकंदरीत दोन-चार उद्योग सोडता उर्वरित उद्योगांवर लॅाकडाऊनचा दीर्घकालीन परिणाम झाल्याचे दिसून येते.