लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेत ‘रिदम-२०२०’ वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडले. यावेळी विविध कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद मिळाली.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्याहस्ते झाले़ यावेळी माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.एम.एस. विभाग प्रमुख डॉ.मनोज पटेल, पदवी विभाग प्रमुख प्रा.तुषार पटेल, शिक्षण मंडळ सदस्य किशोर माळी आदी उपस्थित होते़परिसंस्थेच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स, गीतगायन, लावणी, नाटिका, सोलो डान्स, रॅम्प वॉक आदी कलाविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. यात ‘मन मे शिवा’, ‘मायभवानी’, ‘उडी उडी जाय’, ‘गुनगुन गुना’ अशा सदाबहार गाण्यांवर धमाल नृत्य सादर झाले. विद्यार्थ्यांनी गीतगायन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात परिसंस्थेतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.‘अॅसिड अटॅक’ या आशयावर आधारित नृत्य आविष्काराद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या नृत्याने सर्वांनाच भुरळ घातली. मराठमोळी लावणी नृत्य सादर करून महाराष्ट्राचा मराठी बाणा सादर केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.मनोज सोनवणे, प्रा.दिनेश बोरसे, प्रा.अर्चना जडे, प्रा.सुमित बिडे, प्रा.विजया अहिरे, प्रा.अमित पाटील, प्रा.सचिन सुराणा, प्रा.छाया पाटील, डॉ.दगडु मराठे, प्रा.महेश भावसार, प्रा.मानसी वैद्य, प्रा.प्रियंका शिरसाठ, रजिस्ट्रार वैशाली गोरले, डी.यु. चौधरी, विशाल माहेश्वरी, भारती भावसार यांनी परिश्रम घेतले़
सदाबहार गीतांवरील धमाल नृत्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:17 IST