मालपूर : येथे साथीच्या रोगांची सदृश्य परिस्थिती असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना म्हणून गावाच्या पश्चिम दिशेला म्हणजे इंदिरानगरापासून धुरळ फवारणीला सुरुवात करण्यात आली. ‘लोकमत’ मधील वृत्ताची दखल घेतल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत ेसमाधानाचे वातावरण निर्माण झाले.येथे साथीच्या रोगाच्या सदृश्य परिस्थिती असल्याने ‘लोकमत’ने वृत्त दिले. याची ग्रामपंचायत प्रशासनान व मलेरिया विभागाने दखल घेवून फॉगिंगला सुरुवात केली. इंदिरानगर ते संभाजी फलकापर्यंत रात्री उशिरापर्यंत फवारणी पहिल्या दिवशी केली. तर उर्वरीत गुरुवारी करण्यात आली. यावेळी लहान मुले फवारणीच्या वेळेस चांगलाच आनंद लुटतांना दिसुन आल. तर ग्रामस्थांचा या फवारणीला चांगलाच प्रतिसाद लाभला. नागरिक स्वत:हून माज घरापर्यंत फवारणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी आग्रही दिसले.
मालपूर येथे धुरळ फवारणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:32 IST