शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

दुष्काळाची साडेसाती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:59 IST

पालक मंत्र्यांचा धावता आढावा; मंत्रीद्वयांकडून अपेक्षा

राजेंद्र शर्मा धुळे जिल्ह्याला जणू दुष्काळाची साडेसाती लागली आहे. कारण गेल्या सलग तीन वर्षापासून जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. जिल्ह्यात सरासरी ५३० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी सरासरीपेक्षाही कमी केवळ ४०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६७६ गावांपैकी १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. ही पैसेवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच तालुक्यातून त्याला विरोध झाला. आता ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यात यात निश्चित बदल होईल, अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांचा समावेश  आहे.साक्री तालुक्याचा मात्र समावेश नाही. पण साक्री तालुक्याची परिस्थितीही खूपच बिकट आहे. तालुक्यातील माळमाथा आणि काटवानसह सर्वच परिसरात भीषण दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे साक्री तालुक्याचाही समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. काँग्रेस, शिवसेनेतर्फे निवेदनेही देण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.भर पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यात आठ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातील विहिरींनी आतापासूनच तळ गाठले आहे. आतापासूनच काही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण पावसाळयात टँकर सुरुच होते आणि आता हिवाळ्यातही सुरुच राहणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात  येथील परिस्थिती काय असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत साठलेल्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन काटेकारेपणे करणे आवश्यक आहे. याशिवाय दुष्काळाच्या झळा सोसणा-या बळीराजाला शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. कारण गेल्या वेळेस जाहीर केलेली दुष्काळी मदत अद्याप काही शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यात आता खरीप हंगामास फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. पालक मंत्र्यांचा धावता आढावा - जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडयात पालकमंत्री दादा भुसे यांनी एक दिवसाचा धावता दौरा केला. या दौ-यात त्यांनी धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना आणि काही शेतक-यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. पाहणीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालक मंत्र्यांनी पाणी वाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे तसेच जिल्हा प्रशासनाला त्याचा कृति आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.मंत्रीद्वयांकडून अपेक्षा - पालक मंत्र्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही धुळे तालुक्याची पाहणी केली. त्यांनी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत आणण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे जिल्ह्यातील राज्यातील रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दोघा मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहीजे. सर्वांनी तसे प्रामाणिकपणे एकत्रितरित्या प्रयत्न केले तर त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतक-यांना मिळेल. जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेतेमंडळींनीही मंत्र्यांसोबत दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र आले पाहिजे. दुष्काळाचे केवळ राजकारण आणि श्रेयाचा वाद निर्माण होता कामा नये. अन्यथा जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या या घाणेरडया राजकारणाचा फटका नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी व जनतेला सोसावा लागेल. यंदातरी दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर जिल्ह्यातील नेतेमंडळी एकत्र येतील, अशी माफक अपेक्षा धुळेकरांची आहे.

टॅग्स :Dhuleधुळे