वाॅर्ड क्र.१ मध्ये लांडगे विठ्ठल खंडू ५३५ मतांनी विजयी, तर सोनवणे संजय उदा हे ३७० मते घेऊन पराभूत झाले़ सोमवंशी नंदकिशोर दिलीप ४४९ मते विजयी, भदाणे ईश्वर बारकू ३९७ मत पराभूत झाले. त्यात अपक्ष उमेदवार सोनवणे मोतीलाल काशिनाथ यांना फक्त ४८ मत मिळाली. वाॅर्ड क्र.२ मध्ये खैरनार जयश्री नरेंद्रराव ५९९ मते विजयी, भदाणे चारुशीला सुरेश २७४ मते पराभूत, मोरे सुशीलाबाई भीमराव ५३० मते विजयी, मोरे कल्पनाबाई राजू ३३२ मते पराभूत, खैरनार राजेंद्रराव दगाजीराव ४७५ मते विजयी, तर खैरनार भगवंत भानुदास यांना २१० मते व पाटील हेमंत बालू यांना १९० मते मिळाल्याने पराभवास सामोरे जावे लागले. वाॅर्ड क्र.३ मध्ये माजी सरपंच पवार कैलास देवाजी ५३६ मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्यासमोर मोरे भाईदास फुल्या यांना ४१६ मतेृ मिळाली, मोरे कल्पनाबाई राजू यांना ४९९ विजयी, सोनवणे दीपाली गोरखा ४५६ मते विजयी. भदाणे प्रमिला सुरेश ४९२ मते विजयी, तर महाले रंजना दगडू यांना ४५८ मते मिळून पराभव पत्करावा लागला. वाॅर्ड क्र.४ मध्ये भदाणे चारुशीला सुरेश ३१७ मते विजयी, खैरनार शालिनी गोकुळ १८० मते पराभूत, महाले चंद्रकांत मुरलीधर २९३ मते विजयी, खैरनार नरेंद्रराव शिवाजीराव २०७ मते पराभूत, भदाणे मीराबाई देवराम २९१ मते विजयी, खैरनार प्रमिला अशोक २०५ मते पराभूत. वाॅर्ड क्र.५ मध्ये, खैरनार नरेंद्रराव शिवाजीराव ३१२ मते विजयी, बागुल किशोर देविदास २९३ मते पराभूत, महाले वसंत नामदेव ३३४ मते विजयी, शिंदे योगेंद्र अविनाश २७० मते पराभूत, वाघ अरुणाबाई शांताराम ३२७ मते विजयी, वाघ सिंधुबाई सतीश ३८१ मते पराभूत, वाॅर्ड क्र. ६ ठाकरे सुशीलाबाई सुरसिंग ३०० मते विजयी, भिल अनिता अशोक १९७ मते पराभूत, भिल सुशीलाबाई बापू १०७ मते पराभूत, खेडकर सुनंदा सुरेश २६९ मते विजयी, बोरसे लताबाई विजय १६१ मते पराभूत, सामुद्रे छाया ज्योतिबा १७३ मते पराभूत, पिंपळे विवेकानंद आनंद २७४ मते विजयी, तर महाले श्यामजी श्रावण २५१ मते मिळवून पराभूत झाले, शिंदे गुलाब भगा ७९ मते पराभूत झाले़ याप्रमाणे उमेदवारांचा थोड्याफार मताधिक्याने जय आणि पराजय झाला. त्यातच दोन्ही पॅनलच्या सारख्या जागा म्हणजे ७-७ जागा निवडून आल्यामुळे तिस-या आघाडीमधील निवडलेलेे ३ उमेदवार नेमके कोणत्या पक्षाला किंवा पॅनलला साथ देतात, यासंदर्भात गावक-यांमध्ये उत्सुकता आहे़
दुसाणे ग्रा.पं. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST