- धनंजय सोनवणेलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांत होणाऱ्या कॉपीच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतील कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. कॉपीमुक्तीचा हा धुळे पॅटर्न राज्यभर राबविण्याचा निर्णय मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतला आहे. त्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला.
असे विकसित झाले मॉडेल नरवाडे यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात याचा वापर केला. डिसेंबर २०२२ मध्ये नरवाडे यांना या नावीन्यपूर्ण मॉडेलचे सादरीकरण मंडळाच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमोर देण्यास सांगण्यात आले.
काय आहे धुळे पॅटर्न?जिल्हास्तरावर केंद्रीकृत झूम बैठक होते. प्रत्येक पर्यवेक्षकाने त्यांच्या मोबाइलवरून ‘झूम’ लिंक सुरू करत परीक्षा कक्षात, सर्व विद्यार्थी दिसतील अशा पद्धतीने मोबाइल वर्गात स्थिर ठेवलेले असतात. कुणी काॅपी करताना आढळल्यास, बैठकीचे सूत्रधार संपूर्ण जिल्ह्याला ऐकू येतील, अशा सूचना देतात.
या माध्यमातून परीक्षा आयोजित करताना १०० टक्के पारदर्शकता राहते. अतिरिक्त मनुष्यबळाची गरज नाही. अतिरिक्त खर्च नाही व कॉपीमुक्तीवर प्रभावी अंमल होताे.विशाल नरवाडे, सीईओ, जि.प. धुळे