शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:25 IST

अक्षय्य तृतीयेनिमित्त उत्साह : लाखो रुपयांची उलाढाल; सोने खरेदीवर महिलांचा भर

ठळक मुद्देअक्षय्य तृतीयेच्या सणानिमित्ताने आंबे खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले. पाच कंदील चौकात आंब्याचे दर सकाळी ८० ते १०० रुपये किलो या प्रमाणे होते. तर दुपारनंतर येथील विक्रेत्यांनी आंब्याच्या दरात १० रुपये कमी करून ७० रुपये किलो या प्रमाणे आंब्याची विक्री केली. दत्तमंदिर चौक, नेहरू चौक येथे आंबे विक्रेत्यांकडे आंब्याचे दर हे १०० ते १२० रुपये किलो याप्रमाणे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी झाली होती. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय्य आनंद देणारा अक्षय्य तृतीयेचा सण समजला जातो. या सणानिमित्ताने मंगळवारी बाजारात पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. घागर खरेदीसाठी विक्रेत्यांकडे गर्दी अक्षय्य तृतीयेचा सण धुळे जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या सणाच्या दिवशी घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरातील साक्री रोड, जुना आग्रारोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू नगर पाण्याची टाकीजवळ व अग्रवाल नगर परिसरातील विक्रेत्यांनी  घागर विक्रीसाठी ठेवल्या होत्या.  या दिवशी माठात पाणी टाकून त्यावर डांगर ठेऊन विधीवत पूजा केली जाते. या सणाच्या दिवशी विशेषत: खापरावर तयार केलेल्या पुरणपोळी व आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखविला जातो.  त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी माठ, घागर व मातीपासून तयार केलेले खापर खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसून आली. बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल या सणानिमित्ताने शहरातील   दुचाकी खरेदीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या शो-रूमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. काहींनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच गाड्या खरेदी केल्या. तर काही नागरिकांनी वाहनांच्या शोरूममध्ये जाऊन नोंदणी करून ठेवली असून  बुधवारी या गाड्या ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, सुवर्ण बाजारतही सोने खरेदी करण्यासाठी सकाळी लगबग दिसून आली.

टॅग्स :Dhuleधुळे