शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

रामी येथील तरुणाचा राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:39 IST

नातेवाईकांचा आरोप : पोलिसांकडून कारवाईचे आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील ३८ वर्षाच्या मनोज माळी या युवकाची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद दोंडाईचा  पोलिसात करण्यात आली आहे़ दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी मनोजचा राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा आरोप करीत त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता़ पोलीस अधिकाºयांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावरुन गुन्हा दाखल करुन आणि योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला़ दोंडाईचा येथून जवळच असलेल्या रामी येथील मनोज उत्तम माळी (महाजन) या ३८ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला़ त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत्यूचे  कारण समजू न शकल्याने दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़ त्यानंतर मृतकाचे नातेवाईक व राजकीय कार्यकर्त्यांनी मनोज माळीचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली़ तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला़ घटनेचे गांंभिर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहचले़ त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली़ यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे़ तो प्राप्त झाल्यावर  योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले़दरम्यान मृताचे नातेवाईक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार दोंडाईचा ऐवजी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले़ तज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन केल्यानंतर  मृताचे मरणाचे कारण  समजणार आहे़ शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू नैसर्गिक कारणाने  का इतर कारणाने झाला हे समजणार आहे़ त्या नंतर  योग्य कलमानव्ये गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे़ दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शरीरावर जखम नाहीमृत झालेल्या तरुणास बाहेरून कोणतीही जखम दिसत नाही़ दृश्य स्वरूपात कोणतीही जखम अगर मार लागल्याचे दिसत नसल्याने हृदय विकाराचा झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस व वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत़ तरी देखील शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे़ परिणामी अहवालाकडे आता लक्ष असेल़ पोलीस अधीक्षकांची भूमिकातरुणाच्या मृत्यूचे कारण समजू शकत नसल्याने प्रथम दर्शनी दोंडाईचा पोलिसात अकस्मात  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू हा नैसर्गिक कारणाने का घातपाताने कळणार आहे़ त्यानंतर योग्य त्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी