शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

दमदार पावसामुळे शेतांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:33 IST

शेतकरी चिंतेत : मका, कपाशी पिकाचे नुकसान; साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धुळे तालुक्यातील नेर परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकºयांच्या शेतात पाण्याचे तळे साचले आहे. परिणामी, मका, कपाशीचे नुकसान झाले असून येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे. जून महिन्यात धुळे तालुक्यात पावसाने हजेरी दिली होती. त्यानंतर त्याने दडी मारली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार शेतकºयांनी दुबार पेरणीही केली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे पाऊस कधी येणार? याकडे शेतकरी आस लावून बसले होते. दमदार पावसाने दाणादाण मंगळवारी दुपारी नेरसह खंडलाय, शिरदाणे, भदाणे, लोणखेडी या गावांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे ग्रामस्थांची एकच दाणादाण उडाली. नेर परिसरात सलग दोन तास झालेल्या पावसामुळे गावातील रमेश महादू माळी, साहेबराव गवळे, संजय पाटील, दादाभाई भदाणे, भानू माळी आदी शेतकºयांचे नुकसान झाले. शेतकºयांनी व्यक्त केली नाराजी मुसळधार पावसात कपाशी व मका पिकाचे नुकसान नेर परिसरात झाल्यानंतर मंगळवारी दिवसभरात पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी न फिरकल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री उशिराने वाहतूक पूर्ववत धुळे तालुक्यातील लामकानी व चिंचवार परिसरातही जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे चिंंचवर गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या पुलावरून पावसाचे पाणी गेले होते. परिणामी, धुळे व लामकानी गावाकडे जाणारी वाहने या पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. मंगळवारी रात्री उशिरा पुलावरील पाणी ओसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. धुळे जिल्ह्यात पाऊस असा : (कंसात आतापर्यंत झालेला पाऊस)गेल्या २४ तासात धुळे तालुक्यात १६ मि.मी. (२४७), साक्री २ मि.मी.(२८१), शिरपूर १८ (२५९) व शिंदखेडा ६ मि.मी. (१९० ) पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस शिंदखेडा तालुक्यात तर सर्वाधिक पाऊस साक्री तालुक्यात झाला आहे.दमदार पावसामुळे शेतकºयांवरील दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले आहे. या पावसाने ओडे नाले वाहून निघाले आहे. परंतु, शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.     - सुनील सीताराम भागवत, शेतकरी, नेर शेतात प्रचंड पाणी साचले असून मोठे नुकसान झाले आहे. अक्षरश: शेतात पाण्याचे तळे साचल्यामुळे पुन्हा पेरणी करण्याची वेळ आलेली आहे.         - धनराज परदेशी, शेतकरी, नेर पावसाअभावी पिके कोमेजू लागली निजामपूर :  साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे व माळमाथ्यावरील ब्राह्मणवेल, निजामपूर, दुसाणे महसुली मंडळात आषाढी एकादशीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने पावसाअभावी पिके कोमेजू लागली असून येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. पाऊस नसल्याने बुराई नदीच्या उगमापासून तर बुराई धरणापर्यंत सर्वत्र ठणठणाट दिसत आहे. यंदा एकदासुद्धा पूर गेलेला नाही. नदी पूर्णत: कोरडी आहे. बुराईला पूर गेल्यावरच नदी काठावरील शेतातील विहिरींना पाणी येते. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याची प्रतिक्रिया शिवलाल ठाकरे यांनी दिली आहे. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाची आकडेवारी बरी असली तरीदेखील निजामपूर, जैताणे, खुडाणे, आखाडे, रुणमळी, उभरांढीसह परिसरातील अनेक गावांचे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.