शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दमदार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील १२४ गावांचे ८३ टॅँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 11:17 IST

भीषण पाणी टंचाईमुळे टॅँकरची संख्या ८९ वर पोहचली होती, पावसामुळे टॅँकरमुक्तीकडे वाटचाल

ठळक मुद्देयावर्षी टॅँकरची संख्या सर्वाधिक जुलै अखेरपर्यंत सुरू होते टॅँकरपावसामुळे टॅँकर केले बंद

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणी टंचाईची समस्या जवळपास सुटली आहे. जिल्ह्याची वाटचाल टॅँकर मुक्ततेकडे सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात ९९ गावे व ३७ वाड्या मिळून १२८ गावांसाठी तब्बल ८९ टॅँकर व २५० विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून होत असलेल्या पावसामुळे टॅँकरची संख्या कमी झाली असून, आतापर्यंत १२४ गावांचे ८३ गावांचे टॅँकर बंद करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात अजून काही गावांचे टॅँकर बंद होऊ शकतात अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. २०१८मध्ये सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली होती. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील गावांना बसला होता.यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने, एप्रिल ते जून या तीन महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. सर्वच जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने, पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवसरात्र वणवण भटकंती करावी लागत होती.परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी नियोजन केल्याने, या भीषण पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यात आली.यावर्षी धुळे तालुक्यातील ४० गावे व एक वाडीसाठी ३८ टॅँकर, साक्री तालुक्यातील २४ गावे व ३७ वाड्यांसाठी २८ तर शिंदखेडा तालुक्यातील २७ गावांसाठी २३ टॅँकर असे एकूण १२८ गावे वाड्यांसाठी ८९ पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आले होते.आतापर्यंत जिल्ह्यात साधारणत: पाणी पुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या ३० ते ३५ पर्यंत पोहचत होती. त्याचबरोबर ८० ते १०० विहिरी अधिग्रहित करण्यात येत होत्या. मात्र भीषण पाणी टंचाईमुळे यावर्षी टॅँकरची संख्या लक्षणीय वाढली. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात आले.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन सक्रीय झाल्याने दमदार पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, तलाव भरू लागले. त्यातच आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहर केला. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात झालेल्या दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणासह सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला. त्यामुळे जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अनेक गावांचे टॅँकर बंद करण्यात येऊ लागले.आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ८३ टॅँकरच्या फेºया टप्या-टप्याने बंद करण्यात आलेल्या आहेत. आता फक्त चार गावांसाठी सहा पाण्याचे टॅँकर सुरू आहे. यात धुळे तालुक्यातील फागणे, अंबोडे, वडजई व शिंदखेडा तालुक्यातील वरूड-घुसर या गावाचा समावेश आहे.विहिर अधिग्रहितची संख्या घटलीदमदार पावसामुळे केवळ टॅँकरची संख्याच कमी झालेली नाही तर आता अधिग्रहित विहिरींची संख्याही कमी झालेली आहे. यावर्षी तब्बल २५० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. १३ आॅगस्ट १९ अखेरपर्यंत केवळ सात गावांमध्येच विहिरी अधिग्रहित केलेल्या आहे. २४३ विहिरी अधिग्रहित मुक्त करण्यात आलेल्या आहेत.साक्री तालुका टॅँकरमुक्तसाक्री तालुक्यात २८ टॅँकर सुरू करण्यात आले होते. हे सर्वच्या सर्व टॅँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळे