धुळे : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर भारतात दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने खान्देशातील शेतीमाल वाहतुकीअभावी पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. आमचे म्हणणे केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी त्यांनी केली. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला २० दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह, शेतकऱ्यांचे समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी समर्थन जाहीर केले आहे. शेतकरीविरोधी तिन्ही कायदे मागे घेण्याची मागणी मान्य करावी. उत्तर भारतात दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. खान्देशातील कांदा, केळी, बोरे आदी पिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीतील आंदोलनाबाबत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, एस. यू. तायडे, प्रकाश चव्हाण, काॅ. प्रशांत वाणी, काॅ. दीपक सोनवणे, हेमंत मदाने, सिद्धांत बागुल, हरिचंद्र लोंढे, सदाशिव बोरसे, भालचंद्र पाटील, प्रकाश वाघ, महादू पाटील, देविदास खैरनार, अनिल भिल, सिकंदर पिंजारी, दिलीप भिल, जयराम भिल, वाल्मीक कचवे, सरदारसिंग महिरे, विनोद सोनवणे, अनिल भिल, शांताराम जगताप आदींनी केली आहे.
शेतकरी आंदोलनामुळे जिल्ह्यात शेतीमाल पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:40 IST