लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने जाणाºया तेलाचा टँकर आणि कार यांच्यात अपघात झाला़ ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला़ सुदैवाने जिवीतहानी टळली़ धुळे शहरानजिक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल नालंदाजवळ मंगळवार पहाटे अपघाताची ही घटना घडली़ एमएच ३९ एबी ११२७ क्रमांकाची कार आणि आरजे ४७ जीए १७३४ क्रमांकाचा तेलाचा टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ यात कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले़ तर, जोरदार अपघातामुळे तेलाचा टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला़ यात टँकर चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत़ यात जिवीतहानी झालेली नाही़ तेल पडत असल्यामुळे मात्र तेल चोरणाºयांनी गर्दी केली होती़ नागरीकांच्या गर्दीमुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती़ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी धाव घेतली़
धुळ्यानजिक तेलाचा टँकर उलटला, सुदैवाने हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:00 IST
महामार्गावरील घटना : घटनास्थळी बघ्यांची गर्दी
धुळ्यानजिक तेलाचा टँकर उलटला, सुदैवाने हानी टळली
ठळक मुद्देटँकर आणि कारचा पहाटे अपघातसुदैवाने जिवीतहानी टळलीतेल चोरणाºयांनी केली होती गर्दी