शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी पाहणी म्हणजे शेतक-यांची थट्टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:10 IST

चारा टंचाईमुळे गुरे बाजारात, मालपूर परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने ठोस उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची आशा मावळली आहे. मजूर, मेंढपाळ स्थलांतरीत झाले आहेत. पाणी, चाºयाअभावी जनावरांना गुरे बाजाराची वाट धरावी लागत आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना अजून शासनाकडून पाहणी दौरे सुरु असल्याने ही शेतकºयांची थट्टा सुरु असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व पशुपालकांमध्ये व्यक्त होत आहे.  मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, रुदाणे, वाडी आदी भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. येथील मजूर, मेंढपाळ, पशुपालक स्थलांतरीत झाल्याने गावे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. देवकानगर गाव तर संपूर्ण खाली झाले आहे.  चुडाणे येथे दोन वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पावसाळ्यातही हिच स्थिती होती. चाºयाला जिल्हा बंदी करण्यात आल्यामुळे पैसे देऊनही चारा उपलब्ध होत नाही. यामुळे पशुपालकांना जनावरांसह बाजाराची वाट धरावी लागत आहे.  केंद्र शासनाचे दुष्काळी पहाणी पथक नुकतेच जिल्हा दौºयावर आले. दुष्काळग्रस्त वणी व लळींग शिवारातील शेतीची पहाणी करुन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. मात्र, त्यापेक्षा मालपूर शिवारात भयाण परिस्थिती आहे. पाण्याअभावी गावे ओस पडू लागली आहेत. तब्बल एक तपापासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प कोरडा ठणठणाट आहे. या प्रकल्पात केंद्राच्या सहाय्याने दुष्काळात महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पाणी टाकल्यास निम्मा शिंदखेडा तालुका दुष्काळमुक्त होईल, यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. नुसते दौºयावर दौरे करुन दुष्काळाचे दिवस निघून जातील, हाती काहीच येणार नाही, अशी प्रतिक्रीया शेतकºयांमधून उमटत आहे. याअगोदर संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचे दौरे झाले. पालकमंत्र्यांनी दुष्काळाची पहाणी केली. आता केंद्राचे पथक फिरत आहे. अजून किती दौरे झाल्यावर  येथील पशुपालकांना चारा छावण्याचा लाभ मिळेल, असा सवाल पशुपालकांकडून उपस्थित होत आहे. मात्र, तोपर्यंत गोठ्यात पशुधन शिल्लक राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहे.  जिल्हा चाराबंदी झाल्याने पैसे देऊनही चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरांपुढे काय टाकावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गुरांना जीवंत ठेवण्यासाठी पशुधन विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालपूर परिसरात दुष्काळाचे चटके आतापासूनच बसायला सुरुवात झाली. सततच्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने यावर्षी पेरणी झाल्यानंतर फक्त २६ ते २८ जुलै दरम्यान, एकमेव दमदार पाऊस झाला.  यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने नदी, नाले, सर्व जलयुक्त शिवारातील बंधारे कोरडे झालेले दिसत आहेत. विहीर अधिग्रहण, खोलीकरण करुन दिवस काढले जात आहेत. डिसेंबर जेमतेम पार पडेल तर जानेवारीपासून पाणी टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणीटंचाईचा फटका रब्बी हंगामासाठी बसला आहे. सर्व हंगाम ठप्प असून शेतशिवार ओस पडून असल्याचे चित्र आहे. शेतीपेक्षाही मालपूर परिसरातील बहुतांश भागात गावांसमोर पेयजलाचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुपात समोर आला आहे. याची संपूर्ण पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व त्यांच्या पथकाने या अगोदरच केली असून त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात. तसेच येथील अमरावती मध्यम प्रकल्पात केंद्राच्या सहकार्याने तापीचे पाणी टाकावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे