शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:56 IST

पिंपळपाडा रोड : सहचालक बचावला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील पिंपळपाडा रोडवर भरधाव वेगात असलेला ट्रक पलटी झाला़ यात चालकाचा जागीच मृत्यू ओढवला़ तर, या अपघातात मात्र सहचालक थोडक्यात बचावला आहे़ त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी घडली़ साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यातील पिंपळपाडा ते चावडीपाडा या दरम्यान तीव्र वळण आहे़ या वळणावर तडकेश्वर ता़ मांडवी जि़ सुरत (गुजरात) येथील जीजे १० टीव्ही ७२७२ क्रमांकाचा ट्रक विटाभट्टीसाठी लागणारा दगडीकोळसा चावडीपाडा येथील जयंतीभाई यांच्या गोडावूनवर खाली करुन मांडवी तालुक्यातील तडकेश्वरकडे परतत होता़ पिंपळपाडा ते चावडीपाडा दरम्यानच्या तीव्र वळणावर ट्रक पलटी झाला़ या वाहनाचा चालक काशीराम सुक्करभाई वसावा (२८, रा़ तडकेश्वर, ता़ मांडवी, जि़ सुरत) याचा ट्रकखाली दाबला गेल्याने जागीच मृत्यू ओढवला आहे़ तर सहचालक किरीट कालिदास रावळ (३७, रा़ तडकेश्वर, ता़ मांडवी, जि़ सुरत) याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे़ सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे़ त्याला तात्काळ पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचारानंत त्याला घरी सोडून देण्यात आले़ अपघाताची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रकाश सोनवणे, राजाराम खैरनार, शरद चौरे हे घटनास्थळी दाखल झाले़ या अपघाताची फिर्याद नोंदविण्यात आल्याने भादंवि कलम ३३७, ३०४ (अ), ४२७ व मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र रणधीर घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात