धुळे : मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी ही नियुक्ती केली असून राजस्थान, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या पश्चिम भारताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे़ संजय पाटील यांनी याआधी धुळे जिल्हाध्यक्ष, खान्देश विभागीय अध्यक्ष, गुजरात प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे़ मराठा क्रांती मोर्चा, जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट उपाध्यक्ष, मानव अधिकार कृती गटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या अभ्यास गट, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, संविधान बांधिलकी महोत्सव आदी संघटनांतून सामाजिक कार्यात त्यांनी योगदान दिले आहे़
डॉ़ संजय पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:43 IST